Vijay Singh Mohite Patil_Babanrao Shinde 
पश्चिम महाराष्ट्र

Mohite-Shinde Meeting: विजयसिंह मोहिते पाटलांनी घेतली बबनराव शिंदेंची भेट; दोन कट्टर विरोधकांनी जपला माणुसकीचा जिव्हाळा

Mohite-Shinde Meeting: अकलूजचे मोहिते पाटील आणि माढ्याचे शिंदे हे आज एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.

Vijaykumar Dudhale

Mohite-Shinde Meeting: अकलूजचे मोहिते पाटील आणि माढ्याचे शिंदे हे आज एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. मात्र, एकेकाळी या दोन्ही नेत्यांनी एकत्र काम केलेले आहे. अशात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यातील माणुसकीचा जिव्हाळा कायम असल्याचे आज पुन्हा अधोरेखित झाले.

अवघड हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडून आलेल्या बबनदादांची विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घरी जाऊन आपुलकीने चौकशी केली. बबनराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी निमगाव येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

माजी आमदार शिंदे यांना गेली २० वर्षांपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर यापूर्वी ऑंजिओप्लॉस्टी आणि बायपासचीही शस्त्रक्रिया झाली होती. मात्र त्यांचं हृदय केवळ ३० टक्केच काम करत होतं, त्यामुळे हृदयरोग तज्ज्ञांनी त्यांना हृदयप्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. त्यानुसार शिंदे यांच्यावर अमेरिकेत यशस्वीपणे हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे. त्या अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रियेनंतर बबनदादा तब्बल १४ महिन्यांनंतर नुकतेच माढ्यात परतले.

या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील आणि बबन शिंदे या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी मोहिते पाटील यांनी बबनराव शिंदे यांचा सत्कार केला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अनेक वर्षांनंतर दोन्ही राजकीय घराण्यांतील प्रमुख नेत्यांची ही भेट झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. मात्र ही भेट म्हणजे राजकीय जवळीकतेची सुरुवात आहे की केवळ प्रकृती आणि वाढदिवसानिमित्त झालेली सदिच्छा भेट, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

२०१४ पासून राजकीय संघर्ष

माढा आणि सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील आणि बबनराव शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. विशेषतः २०१४ पासून दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला. निवडणुका, स्थानिक राजकारण आणि विविध राजकीय मुद्द्यांवर दोन्ही बाजू आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता याच दोन राजकीय विरोधकांची एकमेकांच्या निवासस्थानी झालेली भेट राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT