Vishakha Raut: विशाखा राऊतांना हायकोर्टाचा दणका! जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळळी; नगरसेवकपद रद्द होणार का?

Vishakha Raut: विशाखा राऊत यांच्या डोक्यावर नगरसेवकपद रद्द होण्याची टांगती तलवार कायम आहे.
Vishakha Raut
Vishakha RautSarkarnama
Published on
Updated on

Vishakha Raut: मुंबई महापालिकेच्या माजी महापौर आणि ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांची याचिका मुंबई हायकोर्टांन फेटाळून लावली आहे. त्यामुळं त्यांच्या डोक्यावर नगरसेवकपद रद्द होण्याची टांगती तलवार कायम आहे.

Vishakha Raut
Tukaram Mundhe: "प्रत्येक राज्यानं आदर्श घ्यावा"; FSSAIच्या प्रमुखांकडून तुकाराम मुंढेंचं तोंडभरुन कौतुक

विशाखा राऊत या माजी महापौर आहेत तसंच तत्पूर्वीही त्या नगरसेविका होत्या. पण या सर्व निवडणुका त्यांनी खुल्या गटातून लढवल्या होत्या. पण यावेळची निवडणूक त्यांनी राखीव जागेवरुन अर्थात ओबीसी प्रमाणपत्रावर लढवली होती. हे प्रमाणपत्र काढताना आपण वडील, आजोबा आणि पणजोबांच्या ओबीसी प्रमाणपत्र दिलं असल्याचा दावा विशाखा राऊत यांनी केला होता. पण पालघरच्या जात पडताळणी समितीनं त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं आहे.

त्यामुळं जात पडताळणी समितीच्या या निर्णयाविरोधात विशाखा राऊत यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. पण हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळं त्यांच्याकडं आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा शेवटचा पर्याय शिल्लक आहे. जर सुप्रीम कोर्टानंही हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला तर मात्र महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक होऊन त्यात विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द केलं जाऊ शकतं.

Vishakha Raut
Bihar MP Marathi: बिहारच्या खासदारानं CM फडणवीसांशी मराठीतून साधला संवाद! नेपाळच्या प्रलयातून बचावलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना केली मदत

त्यामुळं आता विशाखा राऊत पुढचं पाऊल काय टाकतात आणि महापौर त्यांच्या नगरसेवकाबाबत काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com