Radhakrishna Vikhe Patil  Facebook @Radhakrishna Vikhe Patil
पश्चिम महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil on Shirdi: विखे-पाटलांची मोठी घोषणा: शिर्डी विकास आराखड्यासाठी ५२ कोटींचा निधी मंजूर

Ahmednagar News: शिर्डी शहरात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमानिमित्त राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला

सरकारनामा ब्यूरो

Radhakrishna Vikhe Patil on Shirdi Development : शिर्डी शहराच्या विकासासाठी राज्य सरकारने ५२ कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला आहे. शिर्डी सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. शहराच्या विकासासाठी आपण कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. अशी माहिती अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आज(4 जून) शिर्डी येथे दिली.

शिर्डी शहरात आज ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळ नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, शेती महामंडळाच्या जागांचा जनहितासाठी उपयोग करण्यास राज्य सरकारने (Shinde-Fadanvis Govt) दिलेली मंजूरी दिली आहे. ही शिर्डीच्या विकासासाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे. पायाभूत सुविधांचा उपयोग करून औद्योगिक विकासातून शिर्डी हे रोजगाराचे मुख्य केंद्र करण्याचा आपला प्रयत्न आहे.

जगभरात श्री साईबाबांची महती खूप मोठी आहे. साईबांबाच्या जीवनावरती एक थिमपार्क उभारण्याचा आपला प्रयत्न आहे. यासाठी शेती महामंडळाच्या जागेचा उपयोग करण्यात येईल. या जागेवर आयटी पार्क, लॉजेस्टिक पार्क उभारून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असही विखे पाटील यांनी सांगितले. (Ahmednagar Politics)

या समृध्दी महामार्ग आणि विमानतळ शिर्डीच्या विकासातील जमेच्या बाजू आहेत. यामुळेच आता औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या येण्यास उत्सुक आहेत. यातून शिर्डी व परिसरात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. यामुळे शिर्डी भविष्यात औद्योगिक विकासाचे मोठे केंद्र ठरेल. असा विश्वास विखे -पाटील यांनी व्यक्त केला.

शिर्डी शहरात संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजनांचा अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. शहरातील मोजणी कार्यालयातून येत असलेल्या अडचणीची दखल घेवून या विभागातील समस्या कायमस्वरूपी सुटावी याकरीता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात यावे. बहुतांशी प्रश्नाच्या संदर्भात महसूलमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना करून तातडीने प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT