Maratha Reservation sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Maratha Morcha News : पोतलेत पुढाऱ्यांना गावबंदी; दोनशे जणांच्या रक्ताच्या ठशाचे निवेदन मोदींना पाठवणार

Potale Villege सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी प्रवेशबंदीचे डिजिटल फलक चौकाचौकांत उभे केले असून, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका पोतले गावकऱ्यांनी घेतली आहे.

Umesh Bambare-Patil

-विलास खबाले

Karad Maratha Morcha News : मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय पोतले ( ता. कराड ) येथील सकल मराठा समाज बांधवांनी बैठकीत घेतला. दोनशे जणांच्या अंगठ्याच्या रक्ताच्या ठश्याचे निवेदन तयार केले असून, मुख्यमंत्री अणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते पाठवण्यात येणार आहे. आंदोलनाला पाठिंबा दर्शवताना पुढील दिशा ठरवण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षणाचे Maratha Reservation लोण आता गावागावांत पोहाेचले आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पोतलेच्या सकल मराठा समाजाची बैठक झाली. ग्रामदैवत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झालेल्या या बैठकीत जरांगे-पाटील Jarange Patil यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय बैठकीत घेतला. जरांगे-पाटील जी भूमिका घेतील त्यास आमचा पाठिंबा राहील, असे बैठकीत ठरले. या वेळी घारेवाडी ते पोतलेदरम्यान अडीच किलोमीटर रॅली काढण्यात आली.

एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं, चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष घोषणांनी परिसर दणानून सोडला. सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी प्रवेशबंदीचे डिजिटल फलक चौकाचौकांत उभे केले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका पोतले गावकऱ्यांनी घेतली आहे. Maharashtra Political News

अशोकराव पाटील पोतलेकर, सरपंच अविनाश गुरव, अंकुश नांगरे-पाटील, ऋषिकेश पाटील, भगवान पाटील, सदाशिव पवार, बजरंग नांगरे, अधिकराव पाटील, महादेव पाटील, संदीप पाटील, संजय देसाई, विकास पाटील, अतुल पाटील, सागर पाटील, अनिल माळी, लतिफ मुल्ला, अशोक तपासे, बाळासो राऊत, उमेश पाटील, संपत पाटील, सुनील पाटील, माजी सरपंच रामचंद्र पाटील यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT