Vinay Kore Srkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vinay Kore : विनय कोरे वाढवणार महायुतीची डोकेदुखी; एक दोन नव्हे एवढ्या जागांची मागणी

Rahul Gadkar

Mahayuti Politics : महायुतीचे सहयोगी जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार विनय कोरे यांनी महायुतीला मास्टर स्ट्रोक दिला आहे. आज मुंबई येथे बोलताना त्यांनी महायुतीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि राज्यात इतर ठिकाणी आठ जागांची मागणी केली आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी महायुतीला मास्टर स्ट्रोक दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरे यांच्या या विधानाकडे कसे पाहतात हे औत्सुक्याचा विषय आहे.

मुंबई येथे बोलताना जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे यांनी आपली भूमिका मांडली. आपल्याला राज्यात 12 ते 15 जागा मिळाव्यात अशी मागणी केली. लवकरच महायुतीतील नेत्यांकडे प्रस्ताव देणार असल्याची माहिती कोरे यांनी दिली. दरम्यान कोरे यांचे होम ग्राउंड असलेले पन्हाळा- शाहूवाडी, हातकणंगले, चंदगड पारंपारिक जागा आपल्याकडे ठेवत विधानसभा मतदारसंघावर कोरे यांच्याकडून दावा केला जाऊ शकतो.

जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे (Vinay Kore) यांचे राज्यातील राजकीय वलय महायुती सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा प्राप्त झाले होते. 2014 च्या पराभवानंतर त्यांनी महायुती सोबत 2019 ला पुन्हा विजय प्राप्त करत स्वतःचे राजकीय पुनर्जीवन प्राप्त केले. त्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात त्यांना कॅबिनेट मंत्री पदाची माळ मिळाली होती. पराभवात आर्थिक टंचाईत सापडलेल्या कोरे यांना भाजपकडून मदत करण्यात आले असल्याची चर्चा आहे. त्यानंतर 2019 च्या विजयानंतर त्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून यांच्या वारणा सहकारी साखर कारखान्याला 350 कोटीचे कर्ज मंजूर झाले होते.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील पन्हाळा शाहूवाडी हा मतदारसंघ त्यांचं होम ग्राउंड आहे. मतदारसंघातून ते स्वतः निवडणुकीला सामोरे जातात. तर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून त्यांचे कार्यकर्ते असलेले अशोकराव माने हे निवडणुकीला सामोरे जातात. चंदगड विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचा उमेदवार विधानसभेला नशीब आजमावत असतो. यंदा करवीर विधानसभा मतदारसंघ हा नव्याने दावा करण्याच्या तयारीत आहेत. संताजी घोरपडे हा उमेदवार जनसुराज्य पक्षाकडून निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोरे यांनी कोल्हापूरसह काही महापालिकांच्या निवडणुकाही लढवल्या होत्या. लिंगायत मतदारांच्या पट्ट्यात त्यांनी पहिल्या निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते स्वत पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघातून उभे केलेले अशोकराव माने यांचा थोडक्यात पराभव झाला होता. मात्र त्यावेळच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्यच्या उमेदवारामुळे भाजपच्या शिवाजी पाटील यांचा थोडक्यात पराभव झाला होता."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT