Vinay Kore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vinay Kore Politics: विनय कोरेंच्या कारभाऱ्यांना पाणी पाजलं, पेठ वडगावात 'जनसुराज्य'ला तोंडावर आपटलं

Jansurajya Paksha Political News : तब्बल बारा वर्षानंतर यादव आघाडीने आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र, मलकापूर पाठोपाठ पन्हाळा नगरपालिकेमध्ये स्थानिक मतदाराने कारभाऱ्यांनाच दणका दिल्याने आगामी राजकारणात धोक्याचे इशारे मिळाले आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur Political News: नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालात कोल्हापूर जिल्ह्यात आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्तीला दोन नगराध्यक्षसह पन्हाळा आणि मलकापूरची सत्ता मिळाली असली तरी प्रमुख कारभाऱ्यांना अपक्षांनी दणका दिला आहे.

इतकेच नव्हे तर पेठ वडगावात स्थानिक आघाडीनं तोंडावर आपटले आहे. पन्हाळ्यावर एक हाती सत्ता मिळवणाऱ्या जनसुराज्य शक्तीला स्थानिक राजकारणातून अपक्ष उमेदवारांनीच फटका दिल्याने आगामी राजकारणात धोक्याची घंटा वाजली आहे.

नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून पन्हाळा नगरपालिकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न जनसुराज्य शक्तीचे नेते आमदार विनय कोरे (Vinay Kore) आणि कारभारऱ्यांचा राहिला आहे. सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन ही निवडणूक सुरू असताना अपक्षाने बंड पुकारले. सुरुवातीच्या काळात सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने जनसुराज्य 2 तर शिव शाहू आघाडीच्या चार जागा बिनविरोध झाल्या.

अपक्षांनी माघार घ्यावी यासाठी दबावाचे राजकारण करण्यात आले. मात्र या दबावाला अपक्षाने भीक न घालता ही निवडणूक नेटाने लढवली. यापूर्वी पन्हाळा नगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवणाऱ्या जनसुराज्य शक्तीला काही जागा गमवाव्या लागल्या.

या जागांवर अपक्षांनी झेंडा फडकवला. मागील वेळी नगराध्यक्ष असणाऱ्या स्वाती घडेल यांचे पती रवींद्र धडेल यांनाच पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे जनसुराज्य शक्तीला सत्ता घेतली असली तरी काही जागांवर हादरा सहन करावा लागला.

दुसरीकडे मलकापुरात जनसुराज्य शक्तीने नगरपालिकेवर झेंडा फडकवला असला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने (Shivsena) सात जागा मिळवल्या. पेठवडगाव नगरपालिकेत ताराराणी आघाडीला सोबत घेऊन वीस जागा लढवल्या. मात्र स्थानिक यादव आघाडीने आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्तीला धूळ चारली.

वीसपैकी केवळ जनसुराज्य शक्तीला तीन आणि ताराने आघाडीला दोन जागा मिळाल्या. 2011 साली झालेल्या पेठ वडगाव नगरपालिका निवडणुकीत स्थानिक यादव आघाडीने यश मिळवले होते.

तब्बल बारा वर्षानंतर यादव आघाडीने आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र, मलकापूर पाठोपाठ पन्हाळा नगरपालिकेमध्ये स्थानिक मतदाराने कारभाऱ्यांनाच दणका दिल्याने आगामी राजकारणात धोक्याचे इशारे मिळाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT