Vinay Kore Vs Satej Patil .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vinay Kore Vs Satej Patil: कोल्हापुरात विनय कोरे विरुद्ध सतेज पाटील संघर्ष पेटला; पी.एन पाटील यांच्याबाबत जे घडलं ते सगळं सांगितलं...

Kolhapur Mahayuti : मागील काही वर्षात दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्याबाबत काँग्रेसमध्ये जे काही घडलं. ते आमदार विनय कोरे यांनी सगळं सांगत भांडाफोड केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात नवा राजकीय संघर्ष तयार झाला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: मागील काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संघात असणाऱ्या महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या एकीमुळे महाडिक गटाला सत्तेपासून दूर राहावे लागले. मात्र, राज्यात ज्या पद्धतीने महायुती सत्तेवर आली. त्यानुसार आता सहकारी संस्थेतील नेत्यांमध्ये एकीमध्ये फूट पडताना दिसत आहे. मागील काही वर्षात दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्याबाबत काँग्रेसमध्ये जे काही घडलं. ते आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांनी सगळं सांगत भांडाफोड केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात नवा राजकीय संघर्ष तयार झाला आहे.

नुकत्याच झालेल्या पन्हाळा तालुक्यातील येवलुज येथील कार्यक्रमात जनसुराज्य शक्तीचे नेते आणि महायुतीतील सहयोगी आमदार विनय कोरे यांनी थेट काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये जनसुराज्यमधील कार्यकर्त्यांच्या आपापसात लमतभेदाचा फायदा अनेकांनी घेतला. तो करण्याचा प्रयोग सातत्याने आपल्या वाट्याला आला आहे. हे थांबवण्याचा आता प्रयत्न करा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वांनी एकत्र सामोरे जाऊया, असे आवाहनही आमदार विनय कोरे यांनी केले.

अनेकजण या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले, अनेकांचे राजकीय पक्ष फुटले. यासाठी अनेक आमिष दाखवली गेली. मात्र, या सर्व राजकीय चिखलाकडे पाहत असताना या सर्व काळामध्ये आपल्या पक्षाने स्वतःच्या नावावर वरवंटा लावून घेतलेला नाही. आजवर सर्वच राजकीय पक्षावर बोट दाखवले. पण कोणीही जनसुराज्य पक्षाकडे अजून बोट करू शकत नाही, असेही आमदार कोरे म्हणाले.

ज्या दिवंगत आमदार पी. एन पाटलांनी काँग्रेससोबत इतकी एकनिष्ठता दाखवली. त्यांनी राजीव गांधी यांचा पुतळा कोल्हापुरात उभा राहिला पाहिजे हा आग्रह धरला. त्यांच्या नावाने सूतगिरणी काढली पाहिजे, ही राजकीय पुण्याई वापरणारा पी एन साहेब आहे. त्यांच्या प्रत्येक जयंतीला सद्भावना दौड काढणारा पी एन साहेब आहे. मात्र, या पी. एन पाटील यांच्या वाट्याला काय आलं? त्याचं उत्तर काँग्रेसमध्ये काम केलेल्यांना विचारावा वाटतं, अशी खंत कोरे यांनी व्यक्त केली.

राहुल पाटलांनी काँग्रेस का सोडली हे प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्यांना विचारावा वाटतं. कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर मी आमदार नरकेंच्या विरोधात पॅनेल उभा केलं. कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली.

मात्र, इतका असताना सतेज(बंटी) पाटील (Satej Patil) यांनी कुंभी कारखान्याच्या निवडणुकीत कोणाला सहकार्य केलं? गगनबावड्यातील अडीच ते तीन हजार मतदान हे दक्षिण मतदार संघात कोणी नोंदवली?या सर्वांच्या पराभवाचे कारण कोण ठरलं, असे सवाल आमदार कोरे यांनी उपस्थित केले. इतकं सगळं होत असताना कोणाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जाऊ वाटत आहे. याचा आश्चर्य वाटत असून विदारक चित्र पाहतोय, असेही कोरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT