Satish Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satish Bhosale: जेलमध्ये खोक्याला VIP ट्रीटमेंट; सतीश भोसलेची बडदास्त राखणाऱ्या दोन पोलिसांचे निंलबन

Satish Bhosale VIP- Treatment In Jail: कारागृह आवारात खोक्या जेवणाचा आस्वाद घेत कार्यकर्त्यांशी गप्पा मारत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओमुळे बीड पोलिस प्रशासनाची इभ्रत वेशीला टांगली गेली असल्याची चर्चा आहे.

Mangesh Mahale

पिता-पुत्राला बॅटने मारहाण करणारा सतीश भोसले उर्फे खोक्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जेलमध्ये त्याला पोलिसांनी बडदास्त दिल्याचा व्हिडिओ समोर आली आहे. बीड पोलिसांनी खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर या प्रकरणी दोन पोलिसांनी निंलबन करण्यात आले आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ही कारवाई केली आहे. या दोन्हीही पोलिसांना कारणे दाखवा नोटिश बजावण्यात आली आहे.त्यांची चौकशी होणार आहे.

नवनीत कावत यांनी दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन केल्याने बीड जिल्हा पोलीस दलातील अन्य पोलिस अधिकारी यांचे धाबे दणादणे आहे. दोन जणांनी अमानुष मारहाण करणे, वन्य प्राण्यांच्या शिकार या सारख्या गंभीर गुन्ह्यात खोक्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. पण खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असल्याचे संताप व्यक्त केला जात आहे.

न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी कारागृह आवारात खोक्या जेवणाचा आस्वाद घेत कार्यकर्त्यांशी गप्पा मारत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओमुळे बीड पोलिस प्रशासनाची इभ्रत वेशीला टांगली गेली असल्याची चर्चा आहे.

खोक्या उर्फ सतीश भोसले याला अमानुष मारहाण प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. कोठडीत रवानगी होण्यापूर्वी कारागृहाच्या आवारात खोक्याला पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

जिल्हा कारागृह आवारात बाहेरचा डबा आणून खोक्याला जेवण देण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. याबरोबरच खंडीभर कार्यकर्ते त्याच्या दिमतीला उपस्थित होते. जेवण झाल्यानंतर खोक्याच्या हातावर मिनरल वॉटरओतताना कार्यकर्ता दिसत आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शिरूर न्यायालयाने दिले आहेत. बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करत असताना एखाद्या खास व्यक्तींना शोभेल अशी खोक्याची बडदास्त जेलच्या आवारात ठेवली, खोक्याने जेलच्या बाहेरचा डब्यावर ताण हाणला.

आपल्या कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांना मदत करणारे काही पोलिस होते. जेवण केले, त्यानंतर एका कार्यकर्त्याने त्याला हात धुण्यासाठी पाणी दिले. खोक्या आपल्या मुलीला , नातेवाईकांना भेटला, असे या व्हिडिओत दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT