Lok Sabha Election: लोकसभेनंतर 6 पक्ष झाले मालामाल! निधीसंकलनात कोणी मारली बाजी; काँग्रेस कितव्या क्रमांकावर?

Lok Sabha Elections 2024 Political Party Funding: 22 प्रमुख राजकीय पक्षानी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. निवडणुकीपूर्वी असलेल्या निधीत 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Lok Sabha,
Lok Sabha Sarkarnama
Published on
Updated on

Pune, 24 March 2025: कोणतीही निवडणुक लढवणं हा पैशांचा खेळ असतो. यासाठी राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या आधी निधी जमा करीत असतात. त्याच पैशातून मग निवडणुका लढवल्या जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील सहा पक्षानी निधीसंकलनात बाजी मारली आहे, निवडणूक खर्च कमी आणि निधी संकलन जास्त झाल्याचे माहिती समोर आली आहे.

भारतीय जनता पार्टी (बीजेपी), तेलुगु देशम पार्टी (टीडीपी), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM), लोक जनशक्ति पार्टी (रामविलास), सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट (SDF) आणि ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (AIUDF) या सहा पक्षाच्या निधीमध्ये निवडणुकीच्या आधी असलेल्या निधीपेक्षा निवडणुकीच्या वेळी जमा झालेल्या निधीत वाढ झाली असल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले आहे.

कॉमनवेल्थ ह्यूमन राइट्स इनिशिएटिव्ह (सीएचआरआय) ने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हे विश्लेषण निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या तपशीलावर आधारित आहे. 22 प्रमुख राजकीय पक्षानी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. निवडणुकीपूर्वी असलेल्या निधीत 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Lok Sabha,
Sanjay Raut: तो बघ गद्दार चालला! कुणाल कामराच्या व्हिडिओनंतर राऊतांकडून अजितदादांचा जुना Video व्हायरल

निवडणूक जाहीर होण्याच्या दिवशी 22 राजकीय पक्षाकडे एकूण 11,326 कोटी रुपयांचा निधी होता. निवडणूक प्रक्रिया सुरु असताना यात वाढ होऊन ही रक्कम 7,416 कोटी रुपये जमा झाले. प्रचारात 3,861.6 कोटी रुपये खर्च करण्यात आले. निवडणूक संपल्यानंतर या पक्षाकडे 14,848 कोटी रुपये शिल्लक आहेत.

निवडणुकीच्या आधी भाजपकडे सर्वात जास्त म्हणजे 5,921.8 कोटी रुपये होते. निवडणुकीनंतर भाजपकडे 10, 107.2 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची परिस्थिती खूपच कमकुवत आहे. काँग्रेस निवडणुकीच्या आधी 22 पक्षामध्ये 9 व्या क्रमांकावर आहे. पण निवडणूक प्रक्रिये दरम्यान काँग्रेस 12 व्या क्रमांकावर आहे.

Lok Sabha,
Kolhapur Politics: काँग्रेस निष्ठावंतांचे पुत्र भाजपात? कोल्हापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस्

अन्य पक्षांमध्ये टीडीपीच्या संपत्तीत ६५.४ कोटी रुपये, सीपीएमच्या संपत्तीत ८ कोटी रुपये, एलजेपी-आरव्हीच्या संपत्तीत ९.९ कोटी रुपये, एसडीएफच्या संपत्तीत ७६ लाख रुपये आणि एआययूडीएफच्या संपत्तीत ३.६ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com