
Mumbai, 24 March 2025: ‘थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो में चष्मा.. हाये एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाए जिस थाली में खाए…या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्हिडीओमुळे राज्याचं राजकारण पेटलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी कृणाल कामरा यांच्या व्हिडिओ शेअर करीत या प्रकरणाला हवा दिली आहे. त्यानंतर महायुतीतील घटक पक्षाच्या निशाण्यावर संजय राऊत आहेत.
राऊतांवर टीकेची झोड उडविण्यात येत आहे. त्याला राऊतांनी प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जुना व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. राऊतांनी अजितदादांना ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय म्हणाले होते, याची आठवण करुन दिली आहे.
लोक म्हणतात, तो बघ गद्दार चालला!असे सांगत अजितदादांनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर तोंडसूख घेतल्याचा व्हिडिओ राऊतांनी पोस्ट केला आहे. कुणाल कामरा हेच म्हणाला होता! असे राऊतांनी म्हटलं आहे. कुणाल कामरा यांच्या व्हिडिओचे पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. शिवसैनिकांनी रविवारी कामरा यांच्या स्टुडिओवर हल्ला करुन नुकसान केला आहे. "मुख्यमंत्र्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या समजून घ्यावी," असा टोला राऊतांनी फडणवीसांना हाणला आहे.
कुणाल एक स्टॅण्डअप कॉमेडियन आहे.
२०१३ पासून तो स्टॅण्डअप कॉमेडी करीत आहे. बॅचलर आयुष्य, टीव्हीवरील जाहिराती, मालिका, राजकारण, कॅब ड्रायव्हर यांसारख्या अनेक विषयांवर स्टॅण्डअप कॉमेडी केली आहे.
कुणालने दादरच्या जय हिंद कॉलेजमधून कॉमर्ससाठी प्रवेश घेतला होता.दुसऱ्या वर्षी त्याने कॉलेज सोडले.
प्रसून पांडे यांच्या अॅड फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली.
अॅड फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये कुणाल ११ वर्षे काम करत होता.
२०१७ मध्ये युट्यूबवरील त्याच्या एका व्हिडिओमुळे त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाली होती जुलै २०१७ मध्ये त्याने स्वतःचा शो सुरू केला.
'शट अप या कुणाल' या शोमध्ये तो अनेक राजकारणी लोकांच्या मुलाखती घेऊ लागला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.