Vishal Agarwal Hotel In Mahabaleshwar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Agarwal Hotel In Mahabaleshwar : अगरवालने महाबळेश्वरमध्ये सरकारी जमिनीवर थाटले 5 स्टार हॉटेल; सरकारने दिला दणका...

Satara Collector Action on vishal agarwal Hotel in Mahabaleshwar : मुख्यमंत्र्यांच्या सूचना; अगरवाल यांचा महाबळेश्वरातील बार सील

Umesh Bambare-Patil

Satara Collector Action : पुणे कल्याणीनगर येथील अपघातातील मुख्य आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांचे महाबळेश्वरमधील शासकीय जागेतील अलिशान हॉटेल व बार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशाल अगरवाल यांच्या महाबळेश्वरमधील हॉटेलमधील बार सील केले आहे.

पुणे येथील कल्याणीनगर अपघातातील मुख्य आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांचे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील कनेक्शन उघड झाले आहे. त्यांच्या नावावर एमपीजी क्लब हे पंचतारांकित हॉटेल शासकीय जागेत भाडे कराराने उभारल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवलदार यांना माहिती मिळाली आहे. या हॉटेलवर कारवाई करावी व्हावी, अशी मागणी महाबळेश्वरातील जनतेतून होत होती.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस दरेगावी मुक्कामी होते. त्यावेळी ही सर्व बाब त्यांच्या कानावर मीडियाच्या माध्यमातून गेली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) महाबळेश्वर तालुक्यातील बेकायदेशीर बाबींवर बुलडोझर फिरविण्याची सूचना केली होती. विशाल अगरवाल यांनी शासकीय जागेत उभारलेल्या अलिशान हॉटेलमध्ये बार, स्पा असल्याचे उघड झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या (Eknath Shinde) आदेशनुसार विशाल अगरवाल यांच्या महाबळेश्वरमधील या हॉटेलची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे प्रकरण गांभीर्याने घेत महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांना तातडीने सातारा येथे बोलावून घेतले. अगरवाल यांच्याकडे असलेल्या मिळकतीची मुळ मालकी वापर, बांधकाम परवाना, बार, स्पा या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. दरम्यान, या हॉटेलमधील बार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कारवाई करुन हॉटेलमधील बार सील केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT