Porshe Accident Pune : मॅडमनी खरच काही विचारले नाही, सांगा की पुणे CP साहेब?

Pune Police Commissioner Amitesh Kumar Gupta : पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पुण्यातील कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली, मग पोर्शे कार अपघाताबाबत काहीच बोलल्या नाहीत का?
Amitesh Kumar Gupta Meeting with Rashmi Shukla
Amitesh Kumar Gupta Meeting with Rashmi ShuklaSarkarnama

Amitesh Kumar Gupta Meeting with Rashmi Shukla : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय आहे. या प्रकरणाशी निगडीत दैनंदिन घडामोडींमुळे सर्वसामान्यांना दररोज नवीन गोंधळ पाहायला मिळत आहे, असंच म्हणावे लागेल. कार अपघातापासून सुरू झालेलं हे प्रकरण आता थेट मंत्रालयापर्यंत पोहचलं आहे. मात्र असे असतानाही पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला पुण्यात येऊन आढावा बैठक घेतली आणि त्यात याबाबत काहीच चर्चा झाली नसेल तर हे खरंच धक्कादायक म्हणावं लागेल.

कारण, या प्रकरणावरून केवळ सामाजिकच नव्हे तर राजकीय वातावरणही काहीप्रमाणात तापल्याचं दिसून आलं आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही याप्रकरणावर भूमिका जाहीर करावी लागली आहे. तर पोलिस विभागाने सुरुवातीस घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांनाही टीका सहन करावी लागली होती. यानंतर मग तपासाची सुत्रे वेगाने हालू लागली आणि एक एक घडामोडी समोर येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असे असतानाही गुरुवारी पुणे जिल्हाचे पालकमंत्री आणि पोलीस आयुक्त यांची बैठक झाली. तसेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही पुण्यात येऊन बैठक घेत, शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. मात्र ही बैठक केवळ निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवरील असल्याचे सांगितले गेले.

Amitesh Kumar Gupta Meeting with Rashmi Shukla
Governor Ramesh Bais On Porsche Car Accident : राज्यपाल बैस म्हणतात;...तर 'कल्याणीनगर'सारखी दुर्घटना घडलीच नसती!

पण एकीकडे पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण आणि त्यामधील पोलिसांची भूमिका एवढी चर्चेचा विषय ठरत असताना, महासंचालक मॅडमनी पुण्यात येऊनही या प्रकरणी काहीच विचारलं नाही, हे सर्वसामान्यांना तरी न पटण्यासारखं आहे. त्यामुळे आता 'मॅडमनी खरच काही विचारले नाही, सांगा की पुणे CP साहेब?' असाच प्रश्न निर्माण होत आहे.

‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत गुरुवारी (ता. 30) झालेल्या बैठकीत शहरातील वाहतुकीच्या मुद्यावर चर्चा झाली. मात्र, या वेळी कल्याणीनगर अपघाताच्या मुद्यावर चर्चा झाली नाही,’’ असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी सकाळी पालकमंत्री अजित पवार यांच्या ‘जिजाऊ’ बंगल्यावर त्यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही.

Amitesh Kumar Gupta Meeting with Rashmi Shukla
Porsche Car Accident : आरोपी मुलाचे ब्लड सॅम्पल घेताना 'त्या' डॉक्टरांची शक्कल; पुरावेच नष्ट करण्याचा 'मास्टर प्लॅन' उघड

या संदर्भात अमितेश कुमार(Amitesh Kumar) यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘शहरातील वाहतूक आणि मेट्रोच्या कामाच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. शहरात सध्या मेट्रो आणि उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. ही वाहतूक समस्या सोडविण्यासाठी शहरातील दहा प्रमुख रस्ते प्राधान्याने घेण्यात आले आहेत. या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक समस्या दूर करण्याबाबत चर्चा झाली.’’ या बैठकीस मेट्रोसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणूक मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला(Rashmi Shukla) गुरुवारी सायंकाळी पुण्यात आल्या होत्या. त्यांनी बैठकीत कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. या संदर्भात शुक्ला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com