Vishal Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli LokSabha constituency : 'सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची' विशाल पाटलांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Loksabha Election 2024 : मागच्या काही वर्षांत सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरूपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला

Roshan More

Sangli Political News : सांगलीच्या जागेवर विशाल पाटील यांचा दावा कायम आहे. विश्वजित कदमांच्या सोबत त्यांनी शुक्रवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. या भेटीनंतर शनिवारी सकाळी विशाल पाटील Vishal Patil यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक पत्र लिहिले आहे. 'सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची' असे म्हणत कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आव्हान केले आहे.

मागच्या काही वर्षांत सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच (Congress) जिल्ह्यात विकासरूपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला, त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची (Sangli) असं समीकरणच तयार झालं आहे, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगली काँग्रेसची असून, काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे, असे म्हणत सांगली काँग्रेसलाच मिळेल, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आपण लढू आणि जिंकू

'सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने विश्वजित कदम प्रयत्न करत आहेत. आपण लढू आणि जिंकू' असेदेखील विशाल पाटील यांनी म्हटले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT