Pandharpur Vitthal Mandir Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Vitthal Mandir : पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान बंद राहणार; महत्वाचे कारण आले पुढे...

Vitthal-Rukmini Temple News : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनाचे काम 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या तीन दिवसांत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती श्रीकांत यादव यांनी दिली.

भारत नागणे

Pandharpur, 14 September : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनाचे काम येत्या 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. या काळात तीन दिवस मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे, अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.

या संदर्भात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. १४ सप्टेंबर) मंदिर समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मूर्ती संवर्धनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला.

विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पायाची झीज झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मंदिर समितीने विधी व न्याय विभागाकडे याबाबत अभिप्राय मागितला होता. सरकारच्या सूचनेनुसार आता भारतीय पुरातत्त्व विभागाच्या (ASI) तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धनाचे काम केले जाणार आहे.

दरम्यान, मूर्तीवर लेपन प्रक्रिया करण्यास स्थानिक वारकरी आणि महाराज मंडळींनी यापूर्वी विरोध दर्शवला होता आणि हे प्रकरण न्यायालयात गेले होते.

अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मूर्ती संवर्धन करण्यास परवानगी देत अंतिम निकाल दिला होता. या निकालानंतर आता मंदिर समितीने संवर्धनाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार 23 सप्टेंबर रोजी सायंकाळपासून 25 सप्टेंबरपर्यंत मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर शास्त्रोक्त पद्धतीने लेपन प्रक्रिया केली जाणार आहे. या लेपनामुळे मूर्तीचे आयुष्य वाढण्यास आणि झीज रोखण्यास मदत होणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT