Shahaji Bapu Patil
Shahaji Bapu Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ShahajiBapu Patil : ''तुम्हांला मतदान करूनही..!''; शहाजीबापूंसमोरच मतदारांनी वाचला तक्रारींचा पाढा

सरकारनामा ब्यूरो

ShahajiBapu Patil News : सांगोला मतदारसंघाचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील हे काय झाडी, काय डोंगर या डायलाॅगने एका रात्रीत प्रकाशझोतात आले होते. तसेच त्यांनी शिंदेंच्या बंडात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत साथ दिली होती. त्यानंतर बापूंनी राज्यात ठिकठिकाणी जोरदार भाषणबाजी करत उध्दव ठाकरे, शरद पवार, अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. पण आता याच बापूंना त्यांच्याच मतदारसंघातील नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

आमदार शहाजी बापू पाटील( ShahajiBapu Patil) यांनी आपल्या सांगोला मतदारसंघाचा दौरा करत आहे. यावेळी ते नागरिकांच्या भेटीगाठी घेत असून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. मात्र, नागरिकांनी गावातील समस्यांचा पाढाच शहाजी बापू पाटील यांच्यासमोर वाचला. यामुळे त्यांच्या या दौऱ्याची प्रचंड चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

नागरिक काय म्हणाले?

विकासाच्या मुद्यावरून नागरिकांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी नागरीक म्हणाले, आम्ही तुम्हांला मतदान करूनही मतदारसंघातील गावांमधून सभामंडप, चांगला रस्ता आणि इतर विकासात्मक गोष्टींची कमतरता भासत आहे. त्यामुळे आमदारांनी आतातरी मतदारसंघाचा विकास केला पाहिजे अशी मागणी मतदारांनी केली आहे.

४५ सरपंचांचा शहाजीबापूंवर आरोप

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याविरोधात सोलापूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाकडून बेमुदत उपोषण केलं होतं. यात सांगोला मतदारसंघातील तब्बल 45 ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींची विकास कामे राजकीय दबावापोटी प्रलंबित करण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप सरपंचांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT