Chandrapur News : मोठी बातमी! चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश; 'हे' आहे कारण

Vinay Gowda : जिल्हाधिकाऱ्यांनाच अटक करण्याचे आदेश दिल्यामुळे प्रशासनात एकच खळबळ
Vinay Gowda
Vinay Gowda Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Collector Vinay Gowda News : राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनाच अटक करण्याचे आदेश दिल्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना आयोगाने आदेश दिले आहेत.

माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या जमिनींवर 36 वर्षांपासून अवैध कब्जा केल्याचा आरोप या पीडित आदिवासींचा आहे. जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आणि या प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे.

Vinay Gowda
Sanjay Raut News: बाळासाहेब ठाकरेंनी गद्दारांना कधी आशीर्वाद दिले आहेत का?

आदिवासी जमीन प्रकरणात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा(Vinay Gowda) गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गौडा यांना 16 फेब्रुवारीला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश दिले होते.

मात्र, आयोगापुढे जिल्हाधिकारी स्वतः हजर झाले नाहीत, त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशी हजर झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन 2 मार्चपर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

Vinay Gowda
Kasba By Election: पुणेरी पाट्या लावणारा सापडला; निघाला काँग्रेसचा कार्यकर्ता !

काय आहे नेमकं प्रकरण?

चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यातील माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या जमिनींवर 36 वर्षांपासून अवैध ताबा घेतला आहे. या प्रकरणी विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. पीडित आदिवासींनी या प्रकरणी वेळोवेळी तक्रार केली आहे. अनेक वर्षांपासून त्यांचा न्यायालयीन लढाही सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com