Pune News : कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरु आहे. भाजप आणि महाविकास आघाडीनं ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे चांगलीच रंगतदार अवस्थेत आहे. आपला उमेदवार निवडून येण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून दिग्गज नेतेही मैदानात उतरले आहेत.
भाजप शिवसेना युतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेतेमंडळी कसबा आणि चिंचवडमध्ये तळ ठोकून आहे. तर महाविकास आघाडीकडून स्वत: शरद पवार, अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचारात भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्व केला आहे.
मात्र, प्रचार ऐनभरात असतानातच पुण्यात काही ठिकाणी भाजप(BJP) विरोधी पुणेरी पाट्या लावण्यात आल्या होत्या. यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. पण आता पुणेरी पाट्या लावणारा सापडला आहे.
पुण्यात कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी भाजप विरोधी पुणेरी पाट्या लावण्यात आल्या होत्या. या पाट्या नेमक्या कोणी लावल्या याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.आता मात्र भाजपकडून हे कृत्य काँग्रेस(Congress) नेत्याने केले आहे असा दावा करण्यात आला आहे.
पुणेरी पाट्या लावणारा व्यक्ती हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याचं नाव राहुल जाधव असून तो पुणे मनपामध्ये शिक्षण मंडळात काम करत असून यासोबत आणखी दोन सहकारी होते असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तो आपल्या सहकार्यांसह रात्री २.३० वाजता चोरून चौका चौकात, आपल्या सोसायटीमध्ये पाट्या लावत होता असंही भाजपकडून सांगण्यात आलं आहे.
निवडणूक जाहीर झाली की पुणेरी पाट्यां(Puneri Patya) ची एन्ट्री ही ठरलेलीच असते. या पाट्यांद्वारे राजकीय पक्षांना, उमेदवारांना चांगलेच चिमटे काढले जातात. या पोटनिवडणुकीत मात्र पुणेरी पाट्यांना त्यास उशीर झाला आहे. मात्र, आता अवघ्या तीन दिवस आधी का होईना कसब्यात पुणेरी पाट्यांची 'एन्ट्री' झाली आहे. या पुणेरी पाट्या आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पुणे म्हटलं की, पुणेरी पाट्या ह्या आल्याच. पुणेरी पाट्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी सामाजिक संदेशांसह नागरिकांना चिमटेही घेतले जातात. या चिमट्यांमुळेच पुणेरी पाट्या राज्यात प्रसिद्ध आहेत. आता या पुणेरी पाट्या कसब्यात ठिकठिकाणी दिसू लागल्या आहेत. शाब्दिक कोट्या या पाट्यांच्या माध्यमातून उमेदवाराचा प्रचार करण्यात आला आहे. तसेच त्यावर 'हॅशटॅग'चाही वापर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.