Devendra Fadnavis-Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bawankule Statement : आम्हालाही वाटतं फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत; पण..., भाजपच्या बावनकुळेंचे विधान

Rahul Gadkar

kolhapur News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापुरात आल्यानंतर त्यांची तोफ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बरसली आहे. ज्यावेळी शरद पवार हे पक्षाच्या केंद्रस्थानी होते. त्यावेळी त्यांना सर्व आलबेल वाटत होते, पण शरद पवारांकडे आता पक्ष राहिलेला नाही. अजित पवार यांना भविष्यात आणखी समर्थन मिळेल. जो पक्ष सांभाळेल, त्यांच्यासोबत नेते जातील, अशी टिप्पणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (We also think Devendra Fadnavis should be CM : Statement of BJP's Chandrashekhar Bawankule)

महाराष्ट्रात लोकसभा प्रवास उपक्रम सुरू केला आहे. लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आमचा उपक्रम आहे. संपर्क ते समर्थन असा आमचा प्रवास आहे. जनता आम्हाला समर्थन देत आहे, याचं समाधान आहे. निवडणूक जवळ येईल तसे आम्हला आणखी समर्थन मिळेल आणि आमचा विजय होईल, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. भाजपच्या नेत्यांना वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत. आमच्या केंद्रीय समितीने जर सांगितले की पुढेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील, तर आम्हाला काम करावेच लागेल. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काही दिले नाही, त्यामुळेच आज एकनाथ शिंदे देतात, तर नेते त्यांच्याबरोबर राहतील, असेही बावनकुळे म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांनाही बारामतीला बोलावले होते, पण त्याचा पवार यांना फारसा उपयोग झाला नाही. आतादेखील राहुल गांधी यांना बारामतीला आणले तरी फारसा उपयोग होणार नाही, असा टोलाही शरद पवार यांना बावनकुळे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT