Sangola APMC
Sangola APMC Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola News : "शेकापचा उमेदवार पाडणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये"

दत्तात्रय खंडागळे

Sangola APMC Election : विधानसभेवेळी शेकापच्या उमेदवाराला पाडणाऱ्याबरोबर शेकापचे वारसदार म्हणून घेणारे आज मांडीला मांडी लावून बसले आहेत. माझी योग्यता व निष्ठेवर बोट ठेवणाऱ्यांनी शेकाप पक्षामध्ये आपले योगदान काय? हे आधी प्रथम सांगावे. स्व. आबासाहेब (गणपतराव देशमुख) यांचे विचार पुढे घेऊन निष्ठावंतांना न्याय देण्यासाठी आम्ही परिवर्तनवादी भूमिका घेतली आहे. विचाराचा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्हाला चुकीचे कोणी म्हणत असतील तर ती चूक आम्ही नेहमी करणार, असे म्हणत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व परिवर्तन आघाडीचे पॅनल प्रमुख अॅड. सचिन देशमुख यांनी शेकापला घरचा आहेर दिला.

सांगोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Sangola APMC) निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात 'स्व. गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडी'तील विविध पक्षातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या वेळी परिवर्तन आघाडीचे पॅनल प्रमुख सचिन देशमुख यांनी बाबासाहेब देशमुख यांच्यावर नाव न घेता टीका केली.

देशमुख म्हणाले, "मी शेकापचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. म्हणूनच आमच्या पॅनलला आम्ही स्व. आबासाहेबांचे नाव दिले. तुम्ही आबासाहेबांचे वारसदार असाल तर तुमच्या पॅनलला आबासाहेबांचे नाव, फोटो का दिले नाही? तुम्हाला त्यांच्या नावाचे पित्त आहे का? आम्ही निष्ठावंत असून काहींच्या आकसापोटी आम्हाला डावलले जात आहे. ही निवडणूक परिवर्तनासाठी असून यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल."

यावेळी राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड म्हणाले, "आज सत्ताधारी, प्रस्थापितांनी कार्यकर्त्यांना गृहीतच धरून सोयीनुसार युती, आघाडी केल्या आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असेल तर आम्हाला अशा आघाड्या मान्य नाहीत. आता आमच्या सर्वांचं ठरलंय... या अगोदरही मी प्रस्थापितांच्या विरोधात लढलो आणि निवडूनही आलो आहे. आम्हाला बंडखोर अजिबात म्हणू नका. आम्ही आमच्या पक्षाचे, विचारांचे काम करीत आहोत. आमच्या परिवर्तन आघाडीला निश्चितपणे यश मिळून तालुक्याला नवी राजकीय दिशा मिळणार आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT