APMC Election : बाजार समिती निवडणुकीत गाजत आहे, उद्धव ठाकरेंच्या सैनिकाची ‘ही’ पोस्ट !

Arni : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
Arni APMC
Arni APMCSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal District Arni APMC Election : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीचे स्वरूप आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकाने सोशल मिडियावर केलेली पोष्ट आर्णी तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड व्हायरल होत आहे. (It is going viral in political circles)

आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती झाली आहे. शिवसेना (शिंदे गट), भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे एकत्र लढत आहेत. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व काँग्रेसच्या काही नाराज कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तिसरे पॅनल मैदानात उतरवले आहे.

या निवडणुकीत दुहेरी लढत होत असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमोर उद्धव ठाकरे शिवसेनेने मोठे आव्हान उभे केले आहे. सर्वच पक्ष आपआपल्या पद्धतीने प्रचारात लागले आहेत. आर्णी बाजार समितीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांची सोशल मिडियावर पोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

कट्टर शिवसैनिक असलेल्या फयाज सय्यद यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर ‘मतदार राजा जागा, हो तुझ्या खराब वेळी बाजार समितीत पाच हजार घेऊन टोकन देणारे संचालक घरी आले की, आपली वसुली करून घे… मताचे नंतर बघू आर्णी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक अशी पोष्ट व्हायरल करून शेतकऱ्यांसोबत टोकनचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना चपराक लगावली आहे.

Arni APMC
APMC Election : बार्शीटाकळीत धाबेकरांची सत्ता उलथवण्यासाठी वंचितने घेतला ‘शेतकरी’चा आधार !

दुसरीकडे मतदारांना जागरूक ठेवण्याचा हेतू ठेवत बाजार समिती निवडणुकीत होत असलेल्या गैरप्रकारांची पोलखोलसुध्दा केली असल्याची चर्चा रंगली आहे. सामान्य शिवसैनिक असणारे फय्याद सय्यद उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेचे (Shivsena) एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. या एका पोस्टने ते रातोरात चर्चेत आले आहेत.

निवडणुकीत गाजणार ‘टोकन’..

आर्णी बाजार समितीत शेतकऱ्यांना (Farmers) टोकन देण्याचा विषय आता गाजणार असं दिसतंय. मतदार व शेतकरी (Farmers) सक्रिय झाल्याने मतदार टोकनाचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आर्णी बाजार समिती निवडणुकीत (APMC Election) टोकन विषय गाजणार, हे मात्र नक्की.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com