Ranjitsinh Nimbalkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjitsinh Nimbalkar News : '' आपल्या हक्काच्या पाण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार!'' ; खासदार निंबाळकरांचा सांगोलेकरांना शब्द

Sangola Political News : '' सध्या तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.''

सरकारनामा ब्यूरो

दत्तात्रय खंडागळे

Sangola News : सांगोला तालुक्यात सध्या तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पाणी कशा व कोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांना मिळेल यासाठी मी सतत सर्व योजनांचा पाठपुरावा करत राहीन. तसेच सांगोल्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहीन असा शब्द भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगोलेकरांना दिले आहे.

सांगोला येथे 'समृद्ध महाराष्ट्र - 2023' या महाप्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर (RanjitSinh Nimbalkar) सांगोल्यात आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निंबाळकर म्हणाले, सांगोला तालुक्यातील नीरा उजवा लाभ क्षेत्रातील पाणी काही ठिकाणी बंद झाले आहे. शेतकऱ्यांना वेळेत व त्यांच्या हक्काचे पाणी 'टेल टू हेड' देण्यासंबंधी मी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत असेही ते म्हणाले.

येत्या दोन ते तीन दिवसांत येथील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी मिळणार आहे. हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत मी याचा पाठपुरावा निश्चितपणे करत राहीन. तालुक्यातील सर्वच नद्या कोरड्या पडल्या असून टेंभू योजनेतून मान नदीवरून बंधारे भरण्यासाठीही अधिकाऱ्यांची चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्राचे पाणी दोन ते तीन दिवसांत सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून लवकरच हे पाणी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचेही निंबाळकर यांनी म्हणाले. (Sangola News)

सुमारे सात टीएमसी पाणी तालुक्याला मिळणार...

सध्या तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पाणी कशा व कोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांना(Farmer) मिळेल याविषयी मी सतत सर्व योजनांचा पाठपुरावा करीत राहीन. टेंभू योजनेचे पाणी वाटपाचे फेरनियोजन करण्याचे प्रस्तावित असून या नियोजनातून तालुक्यासाठी सुमारे सात टीएमसी पाणी तालुक्याला मिळणार असल्याचेही खासदार रणजितसिंह निंबाळकर यावेळी म्हणाले.

अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना

सध्या तालुक्यातील निरा उजव्या काल्यातून बंद झालेल्या पाण्याविषयी प्रश्न विचारताच त्यांनी लगेचच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन लावून पाण्याविषयी सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच हे पाणी सांगोल्याला त्वरित सोडण्याची व्यवस्था करावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरूनच दिल्या.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT