Rahul Narvekar on MLA Disqualification : आमदार अपात्रतेवरील नोटीशीची मुदत संपली; कारवाईबाबत नार्वेकरांचे सूचक विधान

Maharashtra political Crisis : शिवसेनेतील बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसाठी बजावलेल्या नोटीशीची वेळ संपली आहे.
Rahul Narvekar
Rahul Narvekar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेतील बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसाठी बजावलेल्या नोटीशीची वेळ संपली आहे. आता बंडखोर आमदारांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यावर भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं.

राहुल नार्वेकर म्हणाले, “आमदारांच्या अपात्रता प्रकरणात उचित कारवाई सुरू आहे. ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेत असतात त्यावेळी ते ‘क्वाजय ज्युडिशियल ऑथेरिटी’ म्हणून काम करत असतात याचं मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर आणि नियमांनुसार कारवाई करू”. आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी सुरू केली जाईल. त्याआधी काही इतर प्रक्रिया सुरू आहेत. यात कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही. तसेच सर्व नियमांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल.

Rahul Narvekar
Thackeray On Shinde Group: शिवसैनिक चुकीला माफी देतो, पण...; उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण ?

शिवसेनेतील बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवत अध्यक्षांना लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याचेही निर्देश दिले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीसा बजावल्या. या नोटीसांची वेळ संपूनही त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्ष कधी सुनावणी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेबाबतचे सर्व अधिकार दिलेले असतानाही अपात्रतेच्या मुद्द्यावर अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी याचिका शिवसेना ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली होती. पण सोळा आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी १८ सप्टेंबरला होणार आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत देखील १८ सप्टेंबरलाच सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या बंडखोर सोळा आमदारांच्या अपात्रता कारवाई आणि मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा न्यायालयाने राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com