Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur DCC Bank : सोलापूर DCC बॅंक निवडणुकीसंदर्भात गोरेंचं मोठं विधान : ‘सर्वांना एका तराजूत तोलता येणार नाही, त्यांना आम्ही सोबत घेणार नाही...’

Jaykumar Gore Statement : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई होईल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. दोषींना निवडणूक लढवू देणार नसल्याचे सांगत बँकेच्या हिताला प्राधान्य दिले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 14 August : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल. जो दोषी नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार नाही. दोषींना निवडणूकही लढवता येणार नाही. दोषी व्यक्तींना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढवणार नाही. बॅंकेच्या हिताच्या विरोधातील उमेदवारही आम्ही घेणार नाही, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केले.

जयकुमार गोरे म्हणाले, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील गैरव्यवहाराची ८८ अन्वये चौकशी सुरू आहे. काही लोक निर्दोष आहेत, काही लोकांनी कर्जे घेतलेली आहेत, ती फेडलेली आहेत, काही लोकांनी कर्जे घेतलेली आहेत, ती ज्या कारणांसाठी घेतली आहेत, त्यासाठी ती वापरली नाहीत आणि फेडलेली नाहीत. त्यामुळे सर्वांना एका तराजूत तोलणं उचित होणार नाही. जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत.

दृष्टीकोन का बदलला?

प्रशासक बॅंक फायद्यात आणू शकत असेल तर संचालक मंडळ असताना ती तोट्यात का गेली. सोलापूर जिल्ह्याचं वैभव असलेल्या बॅंकेकडे बघण्याचा दृष्टीकोन का बदलला, याचा विचार आपण केला पाहिजे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीशी

सुषमा अंधारे यांच्या आरोपावर गोरे म्हणाले, रेस्ट हाऊस १० कोटीचं बांधलं की माझं ऑफीस दहा कोटीचं बांधलं. त्याबाबत बोलण्यात काहीतरी तारतम्य असावं. मी १० पार्ट घेऊन बसलो, आता तुम्ही कुठला पार्ट घेऊन बसला आहात. त्यामुळे पार्टचा मला फरक पडत नाही. प्रस्थापितांनी मला २० वर्षे संपवण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरे ना थांबला ना संपला. देवेंद्र फडणवीस आज माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

वाईट वाटावं याच्यापुढे मी गेलोय

वाईट वाटावं याच्यापुढे मी गेलो आहे. हे कोणाच्या वाट्याला आलेले नाही. मी त्यांच्याशी तुलना करत नाही. त्यांच्या पासगालाही पुरणार नाही. पण शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रास झालाच आहे. चांगलं काम करताना काही गोष्ट सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये लागतं. वाईट तर वाटतंच, वेदनाही होतात. पण मला मुलं, बायको त्यासाठी तयार आहेत. पण त्यासाठी आता कुटुंबही तयार आहे, असेही गोरेंनी स्पष्ट केले.

कर्ज काढून कोविड रुग्णांवर मी ३.५ कोटी रुपये खर्च केले

गोरे म्हणाले, अंधारे यांचा मी पुन्हा एकदा सन्मान करतो. कोविड कालावधीत एक नाही तर चार हजार रुग्णांचं जीव वाचवला आहे, मी कर्ज काढून साडेतीन कोटी रुपये खर्च केले आहेत, त्याचं रेकॉर्ड आहे. त्यांनी जे आरोप केले आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार केलेले फेक रेकॉर्ड आहे. आजच त्यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्याची वस्तुस्थिती तपासात पुढे आलेली आहे आणि तपास होईल आणि त्यावर चर्चाही होईल. पण माझ्या उपचारामुळे ज्या लोकांचं प्राण वाचले किंवा उपचारानंतरही प्राण गेले ते सर्वजण बघत असतील. लोक त्यांचं उत्तर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT