KCR Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

KCR In Pandharpur: BRS साठी पश्चिम महाराष्ट्राचा दरवाजा उघडणारे भगीरथ भालकेंच्या पाठीशी ताकदीने उभे राहणार; KCR यांचा पंढरपूरकरांना शब्द

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur Politic's : भारत राष्ट्र समितीसाठी पश्चिम महाराष्ट्राचा दरवाजा उघडणारे भगीरथ भालके यांच्या पाठीशी आम्ही संपूर्ण ताकदीने उभे राहणार आहेत. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ते फक्त आमदार राहणार नाहीत, तर त्यांना मंत्रिपदही मिळेल, त्यापेक्षाही मोठं पद त्यांना मिळू शकते, त्यासाठी भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले. (We will stand with Bhagirath Bhalke full strength : KCR)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी आज सरकोली (ता. पंढरपूर Pandharpur) येथील शेतकरी मेळाव्यात भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. या सभेला मुख्यमंत्री केसीआर यांच्यासह त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ, आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेते तसेच, महाराष्ट्रातील माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माणिक कदम हे पदाधिकारी उपस्थित होते. प्रवेशानंतर झालेल्या कार्यक्रमात केसीआर बोलत होते.

राव म्हणाले की, भारत राष्ट्र समितीसाठी पश्चिम महाराष्ट्राचा दरवाजा उघडणारे भगीरथ भालके यांच्या पाठीशी आम्ही संपूर्ण ताकदीने उभे राहणार आहेत. मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे माझा आशीर्वाद त्यांना कायम असणार आहे. तुमच्या या तरुण नेत्याला चांगले भविष्य आहे. ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्रिपदही मिळेल, त्यापेक्षाही मोठं पद त्यांना मिळू शकते. भालके यांची प्रगती म्हणजे संपूर्ण पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याची प्रगती आहे. या तरुणा नेत्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहलात, तर प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. अशक्य काहीही नाही.

ज्यांना फळांची अपेक्षा असते, त्यांनी फळाची झाडे लावली पाहिजेत. तुम्ही काट्याचे झाडे लावून फळाची अपेक्षा करू शकत नाही. त्यामुळे आपल्या मतांमध्ये फटाफूट झाली नाही पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. मराठवाड्यातील लोक म्हणातात पश्चिम महाराष्ट्राचे चांगले आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत नाही. लागवडीसाठी खर्च मिळत नाही, असेही केसीआर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT