Prakash Ambedkar- Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : आंबेडकरांचे महाआघाडी स्वागत,पण ते निर्णायक कुठे ठरलेत? ; सुशीलकुमार शिंदेंचा सवाल

विश्वभूषण लिमये

Solapur News : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीत घेण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला त्यांचे स्वागत करावे लागेल. मात्र, प्रकाश आंबेडकर निर्णायक कुठे ठरले आहेत? सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत तर ते तिसऱ्या नंबरला गेले आणि निवडून येणारे पडले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आंबेडकरांच्या महाआघातील प्रवेशाच्या चर्चेवर दिली. (Welcome to Prakash Ambedkar in Mahavikas Aghadi : Sushilkumar Shinde)

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात तळ ठोकून आहेत. अनेक नेत्यांना ते भेट आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असल्याची अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्याबाबत आज त्यांना आंबेडकरांच्या आघाडीतील संभाव्य प्रवेशाबाबत विचारले असता शिंदेंनी आंबेडकरांच्या ताकदीवरच प्रश्नचिन्ह उभारले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ॲड प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत महाविकास आघाडी काय विचार करते, हे मला माहिती नाही. मी त्या आघाडीमध्ये सक्रीय नाही. पण, आमचे नेते काय बोलतील, त्याप्रमाणे आम्ही वागू. आमच्या नेत्यांनी आंबेडकरांना आघाडीत घेण्याचा निर्णय घेतला तर आम्हालाही त्यांचे स्वागतच करावे लागेल. पण, ते कुठे निर्णायक ठरले आहेत, असा सवालच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाबतही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, लोकसभा जागावाटपाचं अजून काही ठरलेले नाही. ज्यावेळी किती, कोणाला, कुठे तिकीट द्यायची याची चर्चा होईल, त्यावेळी निर्णय होईल. आत्ता ज्यांना लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे, ते बोलत राहतील. सोलापूरची जागा मी दोनवेळा लढवली आहे, त्यामुळं तिथं काही प्रश्न येत नाही. मात्र, नवीन काही विचार आला तर बघूया.

मराठा आरक्षणासंदर्भात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीला सरकारला जबाबदार धरले. सरकारने जर मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिलेल असेल, तर ते त्यांनी पूर्ण करावं. जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले होते, त्यावेळी त्यांच्याकडे सरकारचे प्रतिनिधीही गेले होते. त्यांच्याशी बोलणंही झालेलं आहे, त्यामुळे सरकारने जे आश्वासन दिले आहे, ते आता पूर्ण करावं, असा सल्लाही त्यांनी राज्य सरकारला दिला.

आरक्षणाच्या प्रश्नावर काय उपाय काढता येईल, यावर त्यांनी मी आरक्षणामधलाच आहे, त्यामुळं मी काय उपाय सांगणार? मी त्यावेळीही म्हणत होतो की, हे किती काळ चालणार आहे? लोकांची परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत हे राहणारच आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT