Western Maharashtra Politics 
पश्चिम महाराष्ट्र

Western Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्र कोणाच्या पाठीशी उभारणार?; सध्या कोणाकडे किती आमदार पाहा...

Assembly Election 2024 : विधानसभेच्या मागील 2019 च्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून भाजपचे अठरा आमदार निवडून आले होते, शिवसेनेने पाच जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकूण 31 जागा जिंकल्या होत्या.

Vijaykumar Dudhale

Solapur, 17 October : विधानभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून सर्वच राजकीय पक्ष एक ते दोन दिवसांत आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील सहा जागांवर महाविकास आघाडीने यश मिळविले आहे. तोच ट्रेंड विधानसभा निवडणुकीत राहील, असा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र कोणाला कौल देतो, याची उत्सुकता वाढली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) विधानसभेच्या 58 जागा आहेत. विधानसभेच्या मागील 2019 च्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून भाजपचे अठरा आमदार निवडून आले होते, शिवसेनेने पाच जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकूण 31जागा जिंकल्या होत्या. याशिवाय काही अपक्ष आमदारही निवडून आले होते.

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) सातारा, पुणे या दोन जागाच भाजपला जिंकता आल्या आहेत. कारण पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेला तुतारीची हवा जोरात होती. आताही पश्चिम महाराष्ट्रात तुतारीचा बोलबाला आहे. महायुतीचे अनेक आमदारही पवारांकडे उमदेवारीची मागणी करत आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही (Assembly Election) लोकसभेची पुनरावृती होते की महायुती बदल करण्यात यशस्वी ठरते?; हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीतील मतदारसंघनिहाय पक्षीय बलाबल

सोलापूर (एकूण अकरा जागा)

सोलापूर शहर उत्तर.........विजयकुमार देशमुख (भाजप)

दक्षिण सोलापूर.............सुभाष देशमुख (भाजप)

सोलापूर शहर मध्य........ प्रणिती शिंदे (काँग्रेस, सध्या रिक्त)

अक्कलकोट...............सचिन कल्याणशेट्टी (भाजप)

मोहोळ..................यशवंत माने (राष्ट्रवादी काँग्रेस)

करमाळा ............ संजय शिंदे (राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष)

माळशिरस.............राम सातपुते (भाजप)

बार्शी..............राजेंद्र राऊत (भाजप पुरस्कृत अपक्ष)

माढा................ बबनराव शिंदे (राष्ट्रवादी)

सांगोला............. शहाजी पाटील (शिवसेना)

पंढरपूर मंगळवेढा.... समाधान आवताडे (भाजप, पोटनिवडणुकीत विजय)

सातारा (एकूण आठ जागा)

फलटण : दीपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

वाई : मकरंद जाधव (राष्ट्रवादी)

कोरेगाव : महेश शिंदे (शिवसेना)

माण : जयकुमार गोरे (भाजप)

कराड उत्तर : बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी शरद पवार)

कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)

पाटण : शंभूराज देसाई (शिवसेना)

सातारा-जावळी : शिवेंद्रराजे भोसले (भाजप)

सांगली (एकूण आठ जागा)

इस्लामपूर : जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

तासगाव-कवळेमहांकळ : सुमन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

शिराळा : मानसिंग नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

पलूस-कडेगाव : डॉ विश्वजित कदम (काँग्रेस)

जत : विक्रम सावंत (काँग्रेस)

खानापूर : अनिल बाबर (शिवसेना, रिक्त निधन)

मिरज : सुरेश खाडे (भाजप)

सांगली : सुधीर गाडगीळ (भाजप)

कोल्हापूर (एकूण दहा जागा)

कागल : हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)

चंदगड : राजेश पाटील (राष्ट्रवादी)

कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील (काँग्रेस)

हातकणंगले : राजूबाबा आवाळे (काँग्रेस)

करवीर : पी. एन. पाटील (काँग्रेस, निधनामुळे रिक्त)

कोल्हापूर उत्तर : जयश्री जाधव (काँग्रेस)

राधानगरी-भुदरगड : प्रकाश आबीटकर (शिवसेना शिंदे गट)

शिरोळ : राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष)

इचलकरंजी : प्रकाश आवाडे (अपक्ष, भाजपमध्ये प्रवेश)

शाहूवाडी : विनय कोरे (अपक्ष)

पुणे (21जागा)

पुणे जिल्हा

इंदापूर : दत्तात्रेय भरणे (राष्ट्रवादी)

बारामती : अजित पवार (राष्ट्रवादी)

दौंड : राहुल कुल (भाजप)

पुरंदर : संजय जगताप (काँग्रेस)

भोर-हवेली-मुळशी : संग्राम थोपटे (काँग्रेस)

शिरूर हवेली : अशोक पवार (राष्ट्रवादी शरद पवार)

खेड : दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस)

आंबेगाव शिरूर : दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

जुन्नर : अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस)

मावळ : सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस)

पुणे शहर

शिवाजीनगर : सिद्धार्थ शिरोळे (भाजप)

कोथरूड : चंद्रकांत पाटील (भाजप)

खडकवासला : भीमराव तापकीर (भाजप)

पुणे कॅन्टोमेंट : सुनील कांबळे (भाजप)

पर्वती : माधुरी मिसाळ (भाजप)

वडगाव शेरी : सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

हडपसर : चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस)

कसबा : रवींद्र धंगेकर (काँग्रेस, पोटनिवडणुकीत विजय)

पिंपरी चिंचवड

पिंपरी : अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

चिंचवड : अस्मिता जगताप (भाजप)

भोसरी : महेश लांडगे (भाजप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT