Madha Loksabha News : पश्चिम महाराष्ट्र 'भाजपमुक्त' करणार; 'या' नेत्याने घेतली शपथ

Madha Loksabha Election 2024 : 'रासप'च्या घोंगडी बैठकीत भाजपला शह देण्याचा निर्धार
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama

Madha Loksabha News : माढा लोकसभा मतदारसंघात आता राष्ट्रीय समाज पक्षाने लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यावेळेस माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. यासाठी राष्ट्रीय समाजाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फलटण तालुक्यात घोंगडी बैठकीस सुरवात केली. पहिली बैठक कोळकी येथे 'रासप' युवकचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र 'भाजपमुक्त' करण्याचीच शपथ घेतली आहे.

सातारा जिल्ह्यात लोकसभेचे दीड मतदारसंघ आहेत. एक सातारा लोकसभा मतदारसंघ यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ येतात. तर दुसरा आहे. माढा लोकसभा मतदारसंघ यामध्ये जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव हे दोन मतदारसंघ येतात. त्यामुळे विजयासाठी या दोन मतदारसंघावर इच्छुक उमेदवार लक्ष केंद्रीत करतात. त्यादृष्टीने माढा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघात लक्ष घातले आहे. त्यासाठी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून रान उठविण्यास सुरवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar
Nilesh Rane News : राजकारण थांबवणारे निलेश राणे आता विधानसभेच्या आखाड्यात

त्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या दहा टीम तयार केल्या आहेत. या दहा टीम सहा तालुक्यांत जाऊन पक्षाची बांधणी करणार आहेत. त्यासाठी दहा बैठका होणार असून पहिली बैठक फलटण तालुक्यातील कोळकी येथे झाली. रासप युवकचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजितदादा पाटील, खंडेराव सरक, रमेश चव्हाण, निलेश लांडगे, प्रवक्ते संतोष ठोंबरे, विक्रम माने, राजेंद्र रुपनवर, गावडे पाटील यांची बैठकीस उपस्थिती होती.

यावेळी अजितदादा पाटील व संतोष ठोंबरे म्हणाले, रासपच्या वतीने फलटण तालुक्यात बुथ बांधणीसाठी सुरवात केली आहे. महादेव जानकर यांनी बारामतीत रासपच्या चिन्हावर निवडणूक लढून चांगली मते मिळवली होती. यापूर्वीही माढा मतदारसंघात 2009 मध्ये त्यांना चांगली मते मिळाली होती. महादेव जानकर यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यांना येथे मोठा प्रतिसाद मिळत आहे. येथील सर्वसामान्य जनतेला हक्काचा पर्याय म्हणून जानकर साहेब यांच्याकडे पाहिले जात आहे. या मतदारसंघात पक्षाच्या 18 बैठका होणार आहेत. त्यामुळे माढा मतदारसंघात रासपने सुरु केलेल्या या तयारीमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

(Edited By - Chaitanya Machale)

Mahadev Jankar
Pune BJP News : मोहोळ-मुळीकांमध्ये "इव्हेंट वॉर" ; भाजपच्या प्रचाराला सुरवात ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com