पश्चिम महाराष्ट्रात 2026 च्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत सहकार क्षेत्राचा प्रभाव निर्णायक ठरला.
महायुतीमध्ये सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत अंतर्गत शहकटशहाचे राजकारण रंगले असून भाजपला आव्हान निर्माण झाले आहे.
kolhapur News : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रात भाजप हातपाय पसरत आहे. मात्र सहकाराशी संबंधित असलेला मतदार राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या विचारांवर प्रेरित आहे. केंद्राने सहकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार विभाग स्थापन केला. मात्र त्याचा अद्याप फारसा परिणाम पश्चिम महाराष्ट्रावर झालेला नाही असे चित्र आहे. 2026 च्या जिल्हा परिषद निवडणुकात मात्र पश्चिम महाराष्ट्राने सहकाराशी संबंधित असणाऱ्या सत्तेतील पक्षांनाच डोक्यावर घेतले.
कोल्हापूर, सांगली, पाठोपाठ साताऱ्यात देखील राष्ट्रवादीने निर्णय जागा घेतल्या आहेत. काही ठिकाणी स्वतंत्र तर काही ठिकाणी एकत्र लढलेली महायुती सत्ता स्थापनेमध्ये एकत्र येत असली तरी अंतर्गत दोन्ही राष्ट्रवादीकडून भाजपचे नाक दांबऱ्याचं काम सुरू आहे. कोल्हापूर,सांगली आणि साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. सत्ता स्थापनेच्या खेळात महायुतीमध्येच शहकटशहाचे राजकारण रंगले आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या. तब्बल वीस जागांवर निवडून आलेल्या राष्ट्रवादीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि शिव शाहू आघाडीची एक जागा आपलीच असल्याचा दावा केला. तर भाजपने बारा जागा घेत जनसुराज्यच्या पाच जागा आपल्याच असल्याचा दावा करत अध्यक्ष पदावर दावा केला आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी मुरगुडच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष होईल असा ठणकावून दावा केला आहे.
एकंदरीतच कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर सातत्याने भाजपकडून मंत्री मुश्रीफ यांच्यावर दबाव वापरला जात आहे. तर महायुती मधील शिवसेनेची सध्या वेट अँड वॉच ची भूमिका आहे. महापालिकेत वाटाघाती झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची खेळी केवळ लांबून पाहण्यात शिवसेना व्यस्त आहे. कारण पालकमंत्री आबिटकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील अंतर्गत वर्चस्ववाद अजूनही धूमसत आहे. त्यामुळे शिवसेना भाजपला डिस्टर्ब करेल असे कोणतेही काम किंवा वक्तव्य होणार नाही याची खबरदारी घेताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातच राष्ट्रवादीचा की भाजपचा अध्यक्ष होणार? हे पहावे लागणार आहे.
सांगलीचे पालकमंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येणार असा दावा केला असला तरी सर्वाधिक जागा घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणजेच जयंत पाटील किंगमेकर ठरले आहेत. सत्तेसाठी बहुमत नसले तरी महायुतीकडे काठावरचे बहुमत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष फोडण्याच्या तयारीत भाजप असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मात्र या सर्वांच्या मागे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची आहे. पूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनच जिल्हा परिषदेच्या राजकारणाबाबत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केल्याचा दावा केला जात होता. मात्र जागा वाटपावेळी भाजपने घटक पक्षावर ठेवलेलं नियंत्रण दिलेली वागणूक यावरच सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेची समीकरणे अवलंबून आहेत.
सातारा जिल्ह्यातील परिस्थिती पाहता त्रिशंकू बहुमत महायुतीतील घटक पक्षांना मिळाले आहे. भाजपने या ठिकाणी 27 राष्ट्रवादी काँग्रेसने वीस तर शिंदे सेनेने 15 जागा मिळवले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येणार असल्याचा दावा केल्याने जागावाटप आणि पद वाटप मध्ये कोणाला किती संधी मिळणार याची उत्सुकता राष्ट्रवादीला लागली आहे. रात्र भाजप आणि शिंदे सेनेच्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सध्या वेट अँड वॉच ची आहे.
1. पश्चिम महाराष्ट्रात कोणत्या पक्षाने आघाडी घेतली?
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रभावी कामगिरी केली.
2. कोणते जिल्हे विशेष चर्चेत आहेत?
कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे जिल्हे केंद्रस्थानी आहेत.
3. सहकार क्षेत्राचा निवडणुकीवर कसा परिणाम झाला?
सहकाराशी संबंधित मतदारांनी स्थानिक सत्ताधारी पक्षांना पाठिंबा दिल्याचे दिसून आले.
4. महायुतीमध्ये काय स्थिती आहे?
सत्ता स्थापनेदरम्यान अंतर्गत संघर्ष आणि राजकीय शहकटशहा सुरू आहे.
5. भाजपसमोर कोणते आव्हान आहे?
सहकार बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा प्रभाव वाढत असल्याने भाजपला संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.