Pranitha Bhalke-Prashant Paricharak Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pranitha Bhalke : प्रशांत परिचारकांच्या हातात काय? त्यांच्याकडे कशाला उमेदवारी मागायला जाऊ? : प्रणिता भालकेंचा पलटवार

Pandharpur Nagar Parishad Election 2025 : प्रणिता भालके यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर पलटवार करत, उमेदवार घोषित झाल्यानंतर त्यांच्या हातात काहीच नसताना आम्ही त्यांच्याकडे का जावं, असा सवाल उपस्थित केला.

Vijaykumar Dudhale
  1. प्रणिता भालके यांनी प्रशांत परिचारकांच्या आरोपांना पलटवार करत सांगितले की उमेदवारी देण्याचा अधिकार परिचारकांकडेच नसल्याने त्यांच्याकडे जाण्याची गरज नव्हती.

  2. भालकेंनी स्पष्ट केले की त्यांची उमेदवारी ही जनतेतून आलेली असून परिचारकांचे आरोप हे जनतेकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे केलेले आहेत.

  3. परिचारक गेली 40 वर्षे सत्तेत असूनही दाखवण्यासारखे कोणतेही काम नसल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा भालकेंचा आरोप.

Solapur, 25 November : पंढरपूर नगराध्यक्षपदाची भाजपची उमेदवारी प्रशांत परिचारक यांना मागायला, आता त्यांच्या हातात काय आहे? पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उमेदवार घाेषित केले आहेत. त्यांच्या हातात काही नसताना आम्ही कशाला त्यांच्याकडे जाऊ? असा पलटवार प्रणिता भालके यांनी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर केला आहे.

पंढरपूर नगरपरिषदेच्या नगरध्यक्षपदाची उमेदवारी मागण्यासाठी प्रणिता भालके (Pranitha Bhalke) ह्या माझ्याकडे आल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडिक, आमदार समाधान आवताडे आणि मला भेटायला आल्या होत्या. चार तास त्या बसून होत्या, असा दावा माजी आमदार परिचारक यांनी केला आहे. त्याला प्रणिता भालके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पंढरपूर नगरपालिकेची उमेदवारी देणे हे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्या हातातच नाही. ज्या उमेदवारी जाहीर झालेल्या आहेत, त्या भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून झालेल्या आहेत. परिचारक यांच्या हातात काही नव्हतं. त्यांच्याकडून कोणतीही उमेदवारी जाहीर झालेली नाही, असा टोलाही प्रणिता भालके यांनी प्रशांत परिचारकांना लगावला.

भालके म्हणाल्या, माझी उमेदवारी ही जनतेतून आलेली आहे. लोकांनी मला पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे. पंढरपूरच्या जनतेला सोबत घेऊन मी अर्ज भरलेला आहे. कोणाकडे जाऊन वेटिंग करून मी अर्ज घेतलेला नाही. प्रशांत परिचारक माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत.

पंढपूरच्या जनतेकडून आम्हाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला डॅमेज करण्याचा प्रयत्न चालला आहे. लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम केले जात आहे. जनता सूज्ञ आहे, त्यांना माहिती आहे की, कोण योग्य उमेदवार आणि कोण कामाचा माणूस आहे. गेली चाळीस वर्षे परिचारक यांच्याकडेच एकहाती सत्ता आहे. लोकांनी त्यांना संधी दिली आहे. पण आता जनतेलाच बदल हवा आहे, असा दावा भालके यांनी केला.

भालके म्हणाल्या, गेल्या चाळीस वर्षांत त्यांनी सांगावं असं एकही काम केलेलं नाही, त्यामुळे जनतेला सांगावं काय, असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. परिचारक यांच्याकडे कुठलेच व्हिजन नाही, त्यामुळे बिनबुडाचे आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे.

1. प्रश्न: प्रशांत परिचारकांचा नेमका दावा काय होता?

उत्तर: त्यांनी दावा केला की प्रणिता भालके भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांच्यासह अनेक नेत्यांना भेटल्या होत्या.

2. प्रश्न: प्रणिता भालकेंनी हा आरोप का फेटाळला?

उत्तर: कारण उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार परिचारकांकडे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

3. प्रश्न: प्रणिता भालकेंचा त्यांच्या उमेदवारीबाबत काय दावा आहे?

उत्तर: त्यांची उमेदवारी जनतेतून आलेली असून त्यांनी कोणाकडे जाऊन अर्ज मागितलेला नाही.

4. प्रश्न: परिचारकांबद्दल भालके काय म्हणाल्या?

उत्तर: की परिचारकांनी 40 वर्षे सत्तेत असूनही लोकांसाठी कोणतेच ठोस काम केलेले नाही आणि ते फक्त बिनबुडाचे आरोप करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT