Uday Samant 
पश्चिम महाराष्ट्र

Uday Samant: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होताच शिराळ्यात उदय सामंतांची एन्ट्री; थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवारच केला जाहीर

Shirala Nagar Panchayat : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील शिराळा नगरपंचायतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने महायुतीतील भाजप आणि शिवसेनेला धक्का मिळाला आहे.

Rahul Gadkar

-- शिवाजी चौगुले

Shirala Nagar Panchayat : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील शिराळा नगरपंचायतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने महायुतीतील भाजप आणि शिवसेनेला धक्का मिळाला आहे. या राजकीय घडामोडीनंतर मंत्री उदय सामंत यांनी शिराळ्याच्या राजकारणात एन्ट्री करत थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला. भाजपला विचारात घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिराळ्यात येऊन महायुतीच्या नगराध्यक्षपदाचा तिडा समन्वयातून सोडवून अखरे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वगळून भाजप,शिवसेना व मित्र पक्षाकडून शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांची उमेदवारी जाहीर केली.

शिराळा येथे भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिराळा येथील नगरपंचायतवर भगवा फडकेल आणि जागा वाटपाबाबत दोन दिवसात स्थानिक पातळीवर उमेदवारी ठरवली जाईल असे सांगितले. त्यामुळे अखरे महायुतीच्या उमेदवारी वर शिक्कामोर्तब झाला.एकनाथ शिंदे गटाला उमेदवारी जाहीर झाल्याने हा गट रिचार्ज झाला आहे. त्यास भाजप चे मोठे पाठबळ व इतर मित्र पक्षांची साथ लाभणार आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, ॲड. भगतसिंग नाईक, शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, गौरव नायकवडी, विश्वप्रपसिंह नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा होऊन नगराध्यक्षपदी पृथ्वी सिंग नाईक यांचे नाव निश्चित झाले. विरोधकांनी खालच्या पातळीवर षडयंत्र रचले आहेत. स्वतःच्या पक्षाचे चिन्ह खुंटीला टांगले आहे. या विरोधकांचा संधिसाधूपणास मतदारच उत्तर देतील. आमच्या युतीतील घटक पक्षाशी बोलणी व समन्वय चांगला आहे. वरिष्ठांचा सन्मान व त्यांच्या विनंतीचा मान राखून शिवसेना शिंदे गटाच्या पृथ्वीसिंग नाईक यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत आम्ही एकत्रित एकदिलाने यश संपादन करू. यावेळी सुखदेव पाटील, संपतराव देशमुख, नंदकुमार नीळकंठ, के. डी. पाटील, विक्रम पाटील, विनायक गायकवाड, निलेश आवटे, स्वप्नील निकम, सम्राट शिंदे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा होऊन खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, गौरव नायकवडी यांच्या सहमहायुतीच्या सहकाऱ्यांनी माझ्या उमेदवारीला पसंती दिली आहे. त्यांचा आदर व सन्मान राखून मी माझे काम सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे करेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT