Maharashtra Politic's : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सोलापूर जिल्ह्यातील निकटवर्तीय आमदार म्हणून ओळख असलेले संजय शिंदे आजच्या बैठकीला उपस्थित नसल्याची चर्चा होती, त्यामुळे अजितदादांसोबत नेहमी असणारे संजयमामा शिंदे आता कुठे आहेत, अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे. (Where exactly is Ajit Pawar's closest MLA Sanjay Mama Shinde?)
दरम्यान, अजित पवार यांनी चार वर्षांत तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, अनिलबाबा आत्राम, संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या देवगिरी या बंगल्यावर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत करमाळ्याचे आमदार संजय शिंदे कुठेही दिसत नसल्याची चर्चा होती. मात्र, संजय शिंदे यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.
संजय शिंदे यांनी सुरुवातीला भाजपला पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येणार हे पाहून संजय शिंदे यांनी यांनी महाआघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिंदे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.