Dilip Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Congress : दिलीप मानेंचा एबी फार्म कोणी रोखला?; महाराष्ट्राशी संबंधित राष्ट्रीय नेत्याचा आदेश आला अन्‌ सूत्रे फिरली...

Assembly Election 2024 : महाविकास आघाडीत विधानसभेचे मतदारसंघ वाटपापासून उमेदवारी जाहीर करणे अन एबी फार्म वाटपापर्यंत सर्वत्र सावळा गोंधळ दिसून आला होता. विशेषतः सोलापूरमध्ये हा प्रकार प्रकर्षाने दिसून आला होता.

सरकारनामा ब्यूरो

अप्पासाहेब हत्ताळे

Solapur, 30 November : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सोलापुरात काँग्रेसमधील सावळा गोंधळ पुढे आले होता. माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवार जाहीर करून ऐनवेळी एबी फार्म नाकारण्यात आला. तो एबी फार्म माने यांना देण्यास कोणी रोखला होता, याची खमंग चर्चा सोलापुरात रंगली होती. त्यावर सोलापूरच्या शहराध्यक्षांनीच भाष्य केले असून राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्राशी संबंध असणाऱ्या एका बड्या नेत्याने माने यांचा एबी फार्म रोखला होता, असा गौप्यस्फोट केला, त्यामुळे मानेंचा एबी फार्म कोणी रोखला, याचे उत्तर माने समर्थकांना मिळाले आहे.

महाविकास आघाडीत विधानसभेचे मतदारसंघ वाटपापासून उमेदवारी जाहीर करणे अन एबी फार्म वाटपापर्यंत सर्वत्र सावळा गोंधळ दिसून आला होता. विशेषतः सोलापूरमध्ये हा प्रकार प्रकर्षाने दिसून आला होता. सोलापूर दक्षिण मतदारसंघातून काँगेस पक्षाकडून माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिलीप माने यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी अर्जही भरला होता. माने आणि त्यांचे कार्यकर्ते शेवटच्या दिवसांपर्यंत वाट थांबले होते. मात्र, काँग्रेसने त्यांना शेवटपर्यंत एबी फार्मच दिला नाही. त्यामुळे माने यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रचारासाठी सोलापुरात आले होते, त्या वेळी त्यांना भेटायला काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे गेले होते, त्यावेळी त्यांनी आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून काँग्रेसने मानेंना एबी फार्म दिला नाही, असे स्पष्ट केले होते.

दरम्यान, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी माजी आमदार दिलीप माने यांचा एबी फार्म कोणी रोखला, हे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राशी संबंधित असणाऱ्या संघटनेत महत्वाची भूमिका बजाविणारे राष्ट्रीय पातळीवरील एका वरिष्ठ नेत्याच्या आदेशानुसारच दिलीप माने यांचा एबी फॉर्म रोखला, असे त्यांनी नमूद केले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT