Bajrang Punia : काँग्रेस नेत्यावर चार वर्षांची बंदी; ‘कुस्ती’वरून रंगला राजकीय आखाडा

Congress NADA Wrestling BJP Government : बजरंग पुनिया यांनी मागील वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना किसान काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले आहे.
Congress Leaders
Congress LeadersSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : भारतीय राष्ट्रीय किसान काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांना मोठा धक्का बसला आहे. पुढील चार वर्षे ते कुस्ती खेळू शकणार नाहीत. राष्ट्रीय डोपिंगविरोधी प्राधिकरणाने त्यांच्या चार वर्षे बंदी घालण्याच्या निर्णय घेतला आहे. डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पुनिया यांनी राष्ट्रीय टीमच्या निवडीच्या चाचणीवेळी डोपिंग चाचणी करण्यास नकार दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पुनिया यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत NADA वर गंभीर आरोप केले आहेत. पुनिया यांनी टोकिओ ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकले होते. बंदीपूर्वी त्यांचे 23 एप्रिलला निलंबन करण्यात आले होते.

Congress Leaders
Eknath Shinde PC : मोदी, शहांना फोन, CM पदावरील दावा शिंदेंनी सोडला; फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा VIDEO पाहा

आरोप फेटाळताना पुनिया यांनी म्हटले आहे की, चार वर्षांची बंदी म्हणजे माझ्या विरोधातील व्यक्तिगत द्वेष आणि राजकीय षडयंत्राचा परिणाम आहे. महिला कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी केलेल्या आंदोलनाचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. मी कधीही डोपिंग टेस्ट करण्यास नकार दिला नाही, असेही पुनिया यांनी स्पष्ट केले आहे.

भाजप सरकारवर टीका करताना पुनिया म्हणाले, भाजप सरकार आणि फेडरेशनने मला अडकवण्यासाठी आणि माझे करिअर संपवण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे. हा निर्णय निष्पक्ष नसून मी आणि माझ्यासारख्या खेळाडूंना गप्प बसवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पुनिया यांनी केला आहे.

Congress Leaders
Eknath Shinde PC : मोदी, शहांना फोन, CM पदावरील दावा शिंदेंनी सोडला; फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा VIDEO पाहा

'नाडा'ला निष्पक्षतेशी काही देणेघेणे नसल्याचे या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे. याप्रकारे सर्व संस्था सरकारच्या इशाऱ्यावर चालत आहेत. या बंदीमागे खरा उद्देश मला गप्प बसविणे आणि चुकीविरोधातील आवाज रोखण्याचा प्रयत्न हा असल्याचा दावा पुनिया यांनी केला आहे.

मला आयुष्यभर निलंबित केले तरी अन्यायाविरोधात बोलणे बंद करणार नाही, असा इशाराही पुनिया यांनी दिला आहे. हा लढा केवळ माझा नाही तर प्रत्येक खेळाडूचा आहे, ज्यांना यंत्रणेकडून गप्प बसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी या निर्णयाविरोधात अपील करणार असून आपल्या हक्काची लढाई अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहीन, असेही पुनिया यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com