Maharashtra Politic's : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळगावी; भाजपने उचलले मोठे पाऊल, सर्व आमदारांना मुंबईत केले पाचारण...

BJP MLA Meeting : मोदी आणि शहा यांची धक्कातंत्राची पद्धत लक्षात घेता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे शंभर टक्के सांगणे अवघड आहे. त्यामुळे सोमवारच्या भाजपच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 30 November : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या गावी गेल्यामुळे महायुतीमधील सत्तास्थापनेच्या सर्व बैठका स्थगित करण्यात आल्या आहेत. शिंदे यांच्याशिवाय खातेवाटप आणि इतर गोष्टी होऊ शकत नसल्याने महायुतीमधील सर्व घडामोडी थंडावल्या आहेत. मात्र, भाजपने मोठे पाऊल उचलले असून येत्या सोमवारी (ता. ०२ डिसेंबर) नेता निवडीसाठी बैठक बोलावली आहे. त्यात विधीमंडळातील नेता निवडला जाणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील महायुतीला राज्यात मोठे बहुमत मिळाले आहे. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर भाजपने दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील, त्याच्या आड मी येणार नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असला तरी गृहमंत्रिपद शिवसेनेला मिळावे, यासाठी आग्रह धरला आहे. मात्र, भाजप हा गृहमंत्रिपद सोडण्यास तयार नाही. मात्र, शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आडून बसल्याचे सांगितले जात आहे, त्यातूनच नाराज झालेले शिंदे हे तातडीने आपल्या मूळगावी दाखल झाले आहेत, त्यामुळे सत्तास्थापनेच्या सर्व घडामोडी ठप्प झाल्या आहेत.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Solapur EVM News : सोलापुरात ‘ईव्हीएम’ विरोधात मोठं पाऊल; मारकडवाडी स्वखर्चाने ‘बॅलेट’वर पुन्हा घेणार मतदान

शिंदे हे सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या गावी दाखल झालेले असतानाच तिकडे भाजपने मोठे पाऊल उचलेले आहे. भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईला पाचारण केले आहे. येत्या सोमवारी भारतीय जनता पक्षाची नेता निवडीसाठी बैठक होणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित आमदार हे उद्या (रविवारी, ता. 01 डिसेंबर) आणि परवा (सोमवारी, ता. 02 डिसेंबर) मुंबईत दाखल होणार आहेत. या सर्व आमदारांची मुंबईत एकत्रित बैठक होणार आहे. भाजप विधिमंडळ गटाची सोमवारी दुपारी बैठक होईल, त्यानंतर सरकार स्थापनेला गती येईल.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Ramraje Naik Nimbalkar : फलटणमधील पराभवानंतर रामराजे प्रथमच बोलले; म्हणाले ‘आता संघर्षाला सुरुवात...’

भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत कोणाला नेता निवडले जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. सध्या देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, मोदी आणि शहा यांची धक्कातंत्राची पद्धत लक्षात घेता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे शंभर टक्के सांगणे अवघड आहे. त्यामुळे सोमवारच्या भाजपच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com