Ajit Pawar In Kolhapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar In Kolhapur : 'तुला कुणी सांगितलं मला शेंगदाणा चिक्की आवडते?'; दादांच्या प्रश्नाने कार्यकर्ता अवाक..

संभाजी थोरात

Kolhapur News : उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये दाखल झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी दादा जिथं जातील तिथं गर्दी केली होती. यावेळी विशेष म्हणजे दादांवर प्रेम करणाऱ्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) एका कार्यकर्त्यांने दादांना शेंगदाणा चिक्की दिली. यावर दादा म्हणाले, तुला कुणी सांगितलं मला चिक्की आवडते." यानंतर एकच हशा पिकला. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत. आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडले. यानंतर मराठा आरक्षण प्रश्नी एक बैठकी पार पडली. त्यापूर्वी अजित पवार हे शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अनेकजण त्यांना भेटायला येत आहेत.

या भेटीगाठी दरम्यान त्यांचा रवी जोशी नावाचा कार्यकर्तासुद्धा दादांना भेटायला आला. त्याने अजितदादांना यावेळी शेंगदाणा चिक्की दिली. अजितदादा यांना शेंगदाणा चिक्की आवडत असल्याने, त्याने चिक्की घेऊन आल्याचे म्हटलं. अजित पवार यांनी सुद्धा त्याला," तुला कोणी सांगितलं मला चिक्की खूप आवडते," असं म्हणत प्रेमाने चिक्की घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT