Laxman Hake-chhagan Bhujbal-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politic's : भुजबळांना मंत्रिपद देण्याचा निर्णय अजितदादांनी का घेतला? ओबीसी नेत्याने खरे कारण आणले पुढे

Laxman Hake Reaction Chhagan Bhujbal's Minister Post : ओबीसींच्या बाबतीत ठाम भूमिका घेणार नेता कॅबिनेटमध्ये असणं आवश्यक होतं. छगन भुजबळ यांच्या निवडीमुळे ओबीसी चळवळीला पाठबळ मिळणार आहे, त्यामुळे निवडीचे स्वागत आहे.

Vijaykumar Dudhale, विश्वभूषण लिमये

Solapur, 20 May : अखेर सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्याबाबत राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भुजबळ समर्थकांकडून जल्लोष साजरा केला जात असतना मनोज जरांगे पाटील यांनी मात्र नेहमीप्रमाणे भुजबळांवर टीका केली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही भुजबळांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाचे स्वागत केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. ओबीसीची नाराजी कोणत्याही पक्षाला परवडणारी नव्हती, त्यामुळे हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवूनच अजित पवार यांनी भुजबळांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा प्रा. हाके यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले मंत्रिपद भुजबळांना दिले जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता ओबीसी समाज आपल्यापासून दुरावला जाऊ नये, या भूमिकेतून भुजबळांची मंत्रिमंडळातील एन्ट्री झाली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशबाबत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, ओबीसींच्या बाबतीत ठाम भूमिका घेणार नेता कॅबिनेटमध्ये असणं आवश्यक होतं. छगन भुजबळ यांच्या निवडीमुळे ओबीसी चळवळीला पाठबळ मिळणार आहे, त्यामुळे निवडीचे स्वागत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. ओबीसीची नाराजी कोणत्याही पक्षाला परवडणारी नव्हती, हा मुद्दा डोळ्यांसमोर ठेवून अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढच्या काही काळात अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील, असा दावाही हाके यांनी केला आहे.

मनोज जरांगे-पाटील यांच्या टीकेवर लक्ष्मण हाके म्हणाले, देशात लोकशाही आहे. सर्व लोकांचे प्रतिनिधित्व सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळात हवे असते, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना या गोष्टी किती कळतात, याबाबत मला शंका आहे त्यामुळे जरांगे पाटलांवर काय बोलावं, किती बोलावं, त्यापेक्षा न बोललेलंच बरं. मनोज जरांगे पाटलांनी कोणाच्या मतांची भीती घालायचं काम करू नये. या गोष्टी विधानसभेला जरांगेना त्यांची जागा दाखवून दिली आहे.

ज्यापद्धतीने जरांगेंच्या शब्दावर काही मते एकत्र येत असतील, तर ओबीसींची सुद्धा एकत्र येतात, हे विधानसभेला जरांगेंनी पाहिलेले आहे. ओबीसींना काही कळत नाही या भ्रमात जरांगेंनी राहू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27 टक्के ओबीसींचे आरक्षण टिकवणे, हे ओबीसी चळवळीपुढचे आव्हान आहे. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळ समावेशाने या गोष्टीला बळ मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT