
Pune News : शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अर्थ खात्यावर आणि अनुषंगाने राज्याचे अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या सामाजिक न्याय खात्याचे पैसे दुसरीकडे वळवण्यात आल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला. या आरोपांनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. यांच्या या वक्तव्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी चांगला समाचार घेतला आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी महाराष्ट्रा समोर आपली हदबालता बोलून दाखवली आहे. शिरसाट इतकेच हतबल असतील तर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणे आवश्यक आहे. तसंच अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी सामाजिक न्याय विभागाचा आणि समाज कल्याण विभागाचा निधी इतरत्र वळवला आहे. हा निधी कायद्याने वळवता येत नाही त्यामुळे त्याच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केले आहे.
एससी विभागाचे 410 कोटी आणि एसटी विभागाचे 350.5 कोटी असे एकूण 746 कोटी रुपये या राज्याच्या अर्थमंत्र्याने वेगवेगळ्या खात्यांकडे वळवले आहेत. काही जण लाडक्या बहीण योजनेकडे हा निधी कळवला आहे असं सांगत आहेत. मात्र शासनाने लोककल्याणकारी योजना राबवाव्यात पण अशा पद्धतीने सामाजिक न्याय विभागाच्या निधीमध्ये काटछाट करू नये असं हाके यांनी म्हटले आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनाृी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हाके भाऊ तुम्ही वेडे झाला आहात का? असा सवाल रूपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे.तसेच हाके भाऊ आपण ओबीसी नेते आहात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी वेगळा कायदा केलेला नाही असं देखील त्या म्हणाल्या आहेत.
कायदा सर्वांसाठीसारखा आहे मग गोर,गरीब, श्रीमंत कोणत्या जातीचा असो.गुन्हा दाखल होतच नाही पण प्रसिद्धीसाठी वक्तव्य केले जात आहे. संविधानिक कायदेशीर बोलावे अन्यथा हाकेभाऊ तुमच्यासारखे बेकायदेशीर जशास तसे उतर द्यावेच लागणार, असा इशारा रूपाली पाटील-ठोंबरे यांनी लक्ष्मण हाके यांना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.