Praniti Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde : महायुतीने लाडकी बहीण योजना का आणली?; ईव्हीएमकडे बोट करत प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारकडे आता इतर योजनांसाठी पैसेच नाहीत. कारण, सगळे पैसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर वापरले आहेत. सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. आता 9 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून काढले जाणार आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 25 February : महायुतीला निवडणुकीत ईव्हीएम करायचे होते, पण आम्ही लाडक्या बहिणीमुळे जिंकलो, हे दाखवायचे होते; म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली, असा गंभीर आरोप सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारवर केला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील चार गावांतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde ) यांच्याकडून नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे. लोकचळवळीतून ही योजना सुरू करण्यात येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी खासदार शिंदे यांनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली, त्या परिषदेत बोलताना लाडकी बहिण योजनच्या माध्यमातून ईव्हीएम प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे शिंदे यांनी अप्रत्यक्ष सांगितले.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, राज्य सरकारकडे आता इतर योजनांसाठी पैसेच नाहीत. कारण, सगळे पैसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर (CM Ladki Bahin Yojana ) वापरले आहेत. सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. आता 9 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून काढले जाणार आहे.

महापालिकेतील प्रशासकांच्या सातत्याने बदल्या होत आहेत. त्यामुळे कामे होत नाहीत. महानगरपालिका निवडणूक लवकरात लवकर झाल्या पाहिजेत, सर्व काही सुरळीत होईल, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

सोलापूर विमानसेवेसंदर्भात आम्ही अजूनही आकाशाकडे बघत आहोत. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून काही होताना दिसत नाही. आम्ही जेव्हा पुढाकार घेतो, त्यावेळी इगोचा प्रॉब्लेम होतो. दहा वर्षांनी काँग्रेसचा खासदार नागरिकांनी निवडून दिला आहे. लोकांचा विश्वास मी व्यर्थ जाऊ देणार नाही. राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांची पीसी होऊन 20 दिवस झाले तरीही आम्हाला अद्याप मतदार यादी मिळालेली नाही.

भारताने क्रिकेटचा सामना जिंकल्यानंतर भारतविरोधी घोषणा देणे चुकीचे आहे. अशी घटना घडत असेल तर ते चुकीचे आहे. अतिक्रमण काढायचे की नाही याबाबत प्रशासनाने काय कारण दिले मला माहिती नाही. तसेच, नीतेश राणे जे बोलले, त्या वक्तव्याला मला महत्व द्यायचे नाही. मी त्यांच्याविषयी बोलून त्यांचे महत्त्व वाढवणार नाही.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT