Sameer Wankhede  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sameer Wankhede News : ‘भागवतांच्या भेटीनंतरच वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा का? : दाल में कुछ काला है...’

समीर वानखेडे यांच्याजवळ भाजप आणि संघाची पोलखोल करू शकतो, अशा काही वस्तू आहेत का?

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे हे नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन संघप्रमुख मोहन भागवत यांना भेटून आले. त्यानंतर त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला, यात दाल में कुछ काला है, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (Why inquiry of Sameer Wankhede after meeting Mohan Bhagwat? : Nana Patole)

नाना पटोले (Nana Patole) हे आज सोलापुरात होते. सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी समीर वानखेडे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की भाजपचे राज्यातील नेते म्हणत होते की, समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या केसाला धक्का लागला तरी आम्ही पाहून घेऊ. मग आता केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि सक्तवसुली संचानालय (ED )हे केंद्र सरकारचे दोन बंदर बनले आहेत. यातील सीबीआय हे समीर वानखेडेची चौकशी करत आहे, त्यांना एवढा त्रास का, असा माझा सवाल आहे.

असं काय घडलं की, नागपुरात संघ मुख्यालयात जाऊन मोहन भागवतांना भेटल्यानंतर समीर वानखेडे यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा मागे का लागला? याची कारणं काय आहेत. काही ना काही गोष्टी यामागे आहेत. यामध्ये काही ना काही लपलेलं आहे. काही गोष्टी संशयास्पद आहेत, असा प्रश्न निर्माण होतो, असेही पटोले म्हणाले.

नाना पटोले म्हणाले की, समीर वानखेडे यांच्याजवळ भाजप आणि संघाची पोलखोल करू शकतो, अशा काही वस्तू आहेत का? त्यामुळे त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलाय का, असा एक प्रश्न आहे. हा आरोप नाही, तर माझा प्रश्न आहे. संघ मुख्यालयात गेल्यानंतरच त्यांच्यावर चौकशीचा ससेमिरा लागणं, या प्रश्नाची उकल होणं महत्त्वाचं आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT