Subhash Deshmukh-Praniti Shinde-Vijaykumar Deshmukh-Sachin Kalyanshetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde : सोलापूरला मंत्रिपद का मिळालं नाही; प्रणिती शिंदेंनी सांगितलं नेमकं कारण...

Solapur Political News : विधानसभा निवडणुकीत सोलापूरच्या जनतेने भाजपला भरभरून मतदान केले आहे. जिल्ह्यातील तब्बल अकरापैकी पाच आमदार हे भाजपचे निवडून आले आहेत. मागील खेपेलाही भाजप व भाजप समर्थक सहा आमदार निवडून आले होते. मात्र या दोन्ही वेळी भाजपने सोलापूरला मंत्रिपदापासून वंचित ठेवले.

विश्वभूषण लिमये

Solapur, 22 December : सोलापूरला मंत्रिपद मिळालं नाही, ही शोकांतिका आहे. भाजपचं इथलं नेतृत्व सक्षमपणे काम करत नाही; म्हणूनच कदाचित सोलापूरला मंत्रिपद मिळालं नसावं, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल भाजपच्या स्थानिक नेत्यांवर खापर फोडले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात बोलताना शिंदे यांनी सोलापूरच्या मंत्रिपदाबाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या, सोलापूरला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. पण, लक्षात ठेवा मी सोलापूरची खासदार आहे.

वास्तविक, विधानसभा निवडणुकीत सोलापूरच्या (Solapur) जनतेने भाजपला भरभरून मतदान केले आहे. जिल्ह्यातील तब्बल अकरापैकी पाच आमदार हे भाजपचे निवडून आले आहेत. मागील खेपेलाही भाजप व भाजप समर्थक असे सहा आमदार जिल्ह्यातून निवडून आले होते. मात्र या दोन्ही वेळी भाजपने सोलापूरला मंत्रिपदापासून वंचित ठेवले होते.

लाडकी बहीण आता सावत्र झाली आहे का? लाडकी बहीण हा चुनावी जुमला होता, हेच आता समोर आलं आहे, अशी टीका पुन्हा एकदा प्रणिती शिंदेंनी केली. त्या म्हणाल्या, ईव्हीएमची लढाई ही भाजप विरुद्ध काँग्रेस राहिलेली नाही. लोकांची लढाई झाली आहे. मुख्यमंत्री हे ईव्हीएमचे मुख्यमंत्री आहेत. टेंडरसाठी मंत्री मंडळाचे खातेवाटप झाले आहे, असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केले.

खासदार राहुल गांधी हे मारकडवाडीला येणार आहेत. पण, त्यांच्या दौऱ्याची तारीख अजून निश्चित झालेली नाही. मात्र, ईव्हीएमच्या विरोधात पाऊल उचलणाऱ्या मारकडवाडी ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी निश्चितपणे मारकडवाडीला येणार आहेत, असेही खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे पदाचा राजीनामा देण्याबाबत जे बोलले आहेत, ते विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून बोलले आहेत.

दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अनेक निर्णय संविधानाला डावलून घेतले आहेत. नोटबंदीसारखे निर्णय हे असंविधानिक होते. पण भाजपच्या लोकांनी त्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले होते. मात्र, ती फसली आहे. भाजपच्या सरकारच्या काळात देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती आहे, असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT