सोलापूर जिल्ह्यात भाजपचे चार नगराध्यक्ष निवडून आले असले तरी अपेक्षित यश मिळाले नसल्याचे भाजप नेत्यांनी मान्य केले आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्ह्यात युतीची शक्यता मान्य करताना अक्कलकोट तालुक्यात मात्र युती करणार नसल्याचे स्पष्ट केले.
अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी सुधारित आराखडा तयार असून शहराला आदर्श तीर्थक्षेत्र मॉडेल बनवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
Solapur, 23 December : नगरपालिका निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक चार नगराध्यक्ष निवडून आले आहेत. मात्र, आम्हाला अपेक्षित असणारे हे यश नाही, असे पालकमंत्र्यांपासून भाजपच्या अनेक नेत्यांनी असे स्पष्ट केले आहे. नगरपालिका निवडणुकीत स्वबळाची भाषा बोलणाऱ्या भाजपकडून आता युतीची भाषा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाष्य केले आहे. मात्र, अक्कलकोट तालुक्यात युती करणार नाही, असे सांगून त्यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंशी एकत्र येण्यास नकार दिला आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) हे आज (मंगळवारी, ता. २३ डिसेंबर) दुपारी जिल्हा परिषदेत आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील विविध विकास कामांबाबत चर्चा केली. सुमारे तासभर ही चर्चा चालली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यात म्हेत्रे आणि कल्याणशेट्टी हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट आणि मैंदर्गी येथे यश मिळविले आहे, तर म्हेत्रे यांनी दुधनी नगरपरिषदेची सत्ता मिळविली आहे.
सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, जिल्हा परिषद निवडणुकीत मित्रपक्षांशी युती करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोट तालुक्यापुरते निर्णय घेण्याचा अधिकार मला दिले आहेत. जिल्ह्यात अन्यत्र युती होणार असली तरी आमच्या अक्कलकोट तालुक्यात मित्रपक्षांशी युती करणार नाही. जिल्ह्यात भाजप ताकदीने लढेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
नगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्व समाज घटकांना उमेदवारी दिली आहे. विशेषतः मैंदर्गीत मुस्लिमबहुल प्रभागात भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजप सगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. मात्र, विरोधक स्वार्थासाठी चुकीचे 'प्रेझेंट' करतात, असा दावाही कल्याणशेट्टींनी बोलून दाखवला.
अक्कलकोटमध्ये तीर्थक्षेत्र विकासाचे आदर्श मॉडेल उभारू
अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासाचा सुधारित आराखडा तयार केला आहे. तो लवकरच राज्य सरकारकडे सादर करण्यात येईल. त्याबाबत मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होऊ शकली नाही. त्याबाबत लवकरच चर्चा होईल. त्या माध्यमातून शहराला तीर्थक्षेत्राचा एका आदर्श मॉडेल बनवू, असे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
प्र.1: सोलापूर जिल्ह्यात भाजपचे किती नगराध्यक्ष निवडून आले?
उ: सोलापूर जिल्ह्यात भाजपचे चार नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
प्र.2: भाजपला हे यश समाधानकारक वाटते का?
उ: नाही, हे यश अपेक्षेप्रमाणे नसल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले आहे.
प्र.3: अक्कलकोट तालुक्यात युतीबाबत काय निर्णय आहे?
उ: अक्कलकोट तालुक्यात मित्रपक्षांशी युती केली जाणार नाही, असे सचिन कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.
प्र.4: अक्कलकोटसाठी कोणती विकास योजना जाहीर झाली आहे?
उ: अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासाठी सुधारित आराखडा तयार करून शहराला आदर्श मॉडेल बनवण्याचा निर्णय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.