ShahajiBapu Patil : सांगोल्यात एकाकी लढणाऱ्या शहाजीबापूंचं शिंदेंकडून कौतुक; ‘शहाजीबापूंनी सर्वांना आडवं करून टाकलं, बापू एकदम ओक्के’

Eknath Shinde Speech : नगरपालिका निवडणुकीत सांगोल्यात मोठा विजय मिळवणारे माजी आमदार शहाजी पाटील यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार कार्यक्रमात खुलेपणाने कौतुक केले, शिवसेनेची ताकद अधोरेखित केली.
Eknath Shinde-Shahajibapu Patil
Eknath Shinde-Shahajibapu PatilSarkarnama
Published on
Updated on
  1. नगरपालिका निवडणुकीतील शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाला.

  2. सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी भाजप व सर्वपक्षीय पॅनेलचा पराभव केल्याबद्दल शिंदेंनी भाषणात विशेष कौतुक केले.

  3. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या राज्यभरातील यशाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली.

Mumbai, 23 December : नगरपालिका निवडणुकीतील शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवकांचा मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या सत्कारच्या कार्यक्रमात सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी भाजप आणि सर्वपक्षीय पॅनेलला पराभूत करत नगराध्यक्ष आणि नगरसेवक बहुसंख्येने निवडून आणले, त्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री शिंदेंनी भाषणातून केला. शहाजीबापूंनी सर्वांना आडवं करून टाकलं, शहाजीबापू एकदम ओके, अशा शब्दांत शिंदेंनी माजी आमदार पाटील यांचे कौतुक केले.

मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार प्रामुख्याने उपस्थित होते. त्या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका निवडणुकीवर भाष्य केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली.

मी ज्या ठिकाणी प्रचाराला जायचो, त्या ठिकाणच्या सभेला लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. लाडके भाऊ जरा कमी दिसत होते. ते घर थांबून होते की काय, अशी मिश्किल टिपण्णी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेनेचे संपूर्ण राज्यात ६२ पेक्षा जास्त नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तसेच, शिवसेना पुरस्कृत असे ७० नगराध्यक्ष आपले निवडून आले आहेत. कमी जागा लढून जास्तीचे यश आपण मिळविले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे आपण स्ट्राईक रेट नगरपालिका निवडणुकीत राखला आहे.

Eknath Shinde-Shahajibapu Patil
Ajit Pawar NCP : राष्ट्रवादीसाठी महायुतीचे दरवाजे बंद : शिंदेंच्या मंत्र्याची घोषणा, नगरपालिका निवडणुकीनंतर वाढला कॉन्फिडन्स

शिवसेना फक्त मुंबई ठाण्यापुरती मर्यादित आहे, असं बोललं जायचं. पण, नगरपालिका निवडणुकीत आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत यश मिळविले आहे. मंचर, चाकण त्र्यंबकेश्वरला काही नव्हतं. पण, त्या ठिकाणीही आपण यश मिळवलं आहे. चंद्रपूर, भद्रावती, धानोरला आपण आलो. इथं शहाजीबापू पाटील बसले आहेत. भाषणात असा उल्लेख करताच शहाजीबापू पाटील हे भर व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाया पडले.

इथं सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील बसले आहेत. शहाजीबापूंना तर सर्वांनी चक्रव्यूहात पकडलं होतं. पण, ते चक्रव्यूह भेदून त्यांनी सर्वांना आडवं करून टाकलं. शहाजीबापू एकदम ओके, अशा शब्दांत शिंदे यांनी शहाजी पाटील यांचे कौतुक केले.

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला आता शिवसेनेची बांधणी करायची आहे. प्रत्येक नगराध्यक्ष, नगरपालिका आणि नगरसेवकांना मी वेळ देणार आहे. नकली घरपर बैठे है, असली मेरे सामने बैठे है, असे सांगून त्यांनी ठाकरेंना टोला लगावला.

Eknath Shinde-Shahajibapu Patil
Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेची सोलापुरात अजब तऱ्हा; इच्छुकांच्या मुलाखतींसाठी नेते एकत्र येईनात

प्र.1: सत्कार कार्यक्रम कोठे झाला?
उ: मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्कार कार्यक्रम झाला.

प्र.2: एकनाथ शिंदे यांनी शहाजी पाटील यांचे कौतुक का केले?
उ: शहाजी पाटील यांनी भाजप व सर्वपक्षीय पॅनेलचा पराभव करून नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणल्यामुळे.

प्र.3: नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला किती नगराध्यक्ष मिळाले?
उ: शिवसेनेचे ६२ पेक्षा जास्त आणि शिवसेना पुरस्कृत ७० नगराध्यक्ष निवडून आले.

प्र.4: शिंदेंनी भाषणात कोणावर टोलेबाजी केली?
उ: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com