Rajendra Phalke, NCP
Rajendra Phalke, NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगरचे पालकमंत्री महिन्याभरात बदलणार? : जिल्ह्यात आणखी एक मंत्रीपद देण्याची मागणी

सूर्यकांत नेटके

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बदलण्याची चर्चा मागील वर्षभरापासून सुरू आहे. मात्र यावर पहिल्यांदाच अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्या चर्चेला उधाण आले आहे. ( Will the city's Guardian Minister change within a month? : Demand for another ministerial post in the district )

राजेंद्र फाळके म्हणाले, राजकीय व्यापामुळे अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ येथे काम करण्याबाबत इच्छुक नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना वेळ देता येत नसल्याने नवीन पालकमंत्री द्यावेत अशी मागणी आहे. त्या अनुषंगाने महिनाभराच्या आत पालकमंत्री बदल होऊ शकतो, असे फाळके यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पाहता आणखी एक मंत्रीपद द्यावे अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद भक्कम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगर जिल्ह्यात सहा आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थावर वर्चस्व आहे. लवकरच होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकांसह अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने पूर्ण तयारी केली आहे. ज्या भागात जशी परिस्थिती असेल तशी आघाडी-युती करण्याचे पातळीवर नियोजन आहे. मात्र कुठेही भाजप सोबत जाणार नाही हे निश्चित केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, युवक राष्ट्रवादीचे कार्यकार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवक नेते संजय कोळगे यांच्यासह काँग्रेस पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

दोन जिल्हा परिषद सदस्यांचा पक्ष प्रवेश होणार

अहमदनगर जिल्ह्यात पक्षाची ताकद पाहता जिल्ह्यात आणखी एक मंत्री पत्र देणे गरजेचे आहे, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत. दोन जिल्हा परिषद सदस्यांचा पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश होणार आहे. यामुळे भाजपला धक्का बसेल. पालकमंत्री असताना राम शिंदे यांचा आमच्याच पक्षाने पराभव केला. 2024 मधील विधानसभा निवडणुकीतही निवडून येणारच नव्हते त्यामुळे त्यांना पक्षाने विधान परिषदेवर नेले. महिनाभरात अहमदनगरचे पालकमंत्री बदलणार आहेत. आम्ही जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री करावे आग्रही आहोत. मात्र पक्षाने इतर ठिकाणचा पालकमंत्री दिला तरी स्वागतच करू, असे राजेंद्र फाळके यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT