Yadrav Grampanchayat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Yadrav Gramsabha : माजी मंत्र्यांच्या गावात महिन्यातच दोनदा राडा; नेमकं काय झालं ?

Rahul Gadkar

Kolhapur Politics : शिरोळ तालुक्यातील यड्राव ग्रामसभेमध्ये मागील सभेचे प्रोसिडिंग कायम करण्याच्या विषयावरून वाद झाला होता. आता ग्रामसभेत ऐनवेळी येणाऱ्या विषयावरून पुन्हा एकदा राडा झाला. ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा न करता केवळ पंधरा मिनिटांत सभा संपवून सत्ताधाऱ्यांनी सभागृह सोडले.

यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक उमेश रेळेकर यांना धारेवर धरले. अडीच महिन्यांत या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दोन वेळा राडा झाला आहे. त्यामुळे माजी मंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गावात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न जिल्हाभर उपस्थित केला जात आहे.

मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, यावरून मागील ग्रामसभा कायदेशीर की बेकायदेशीर, याबाबत १५ डिसेंबर रोजीची सभा सरपंचांनी रद्द केली होती. या कारणावरून मागील ग्रामसभेत राडा झाला होता. तीच ग्रामसभा मंगळवारी घेण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर यांना सभा अध्यक्ष करण्यात आले. त्यास सर्वानुमते मंजुरी मिळाली. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे या विषयावरून मागील ग्रामसभा कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत निर्णय होईपर्यंत त्या सभेतील झालेले ठराव जैसे थे ठेवण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली.

विषयपत्रिकेवरील इतर विषयांना ग्रामस्थांनी मंजुरी देत ऐनवेळचे विषय चर्चेसाठी घेण्याची मागणी केली. परंतु, सभाध्यक्ष सरपंच यांनी या सभेत ऐनवेळी आलेले विषय चर्चेला घेतले जाणार नाहीत, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. परंतु, ग्रामस्थांनी ऐनवेळच्या विषयासाठी दिलेल्या लेखी अर्जावर चर्चा झालीच पाहिजे, यासाठी आग्रह धरला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर ग्रामसेवक उमेश रेळेकरांनी, सभाध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केल्याने आता काही करता येत नाही, असे स्पष्टीकरण दिले. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले अन् त्यांनी ग्रामसेवकांना धारेवर धरले. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. मनमानी कारभार चालणार नाही, असा संताप व्यक्त केला. यावेळी अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. दोन महिन्यांत मोठे राडे झाल्याने यड्राव गावात नेमकं चाललंय तरी काय, अशी चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT