Shinde Cabinet : मंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला नव्हता... राजेंद्र पाटील-यड्रावकर

यड्रावकर Rajendra Patil म्हणाले, कार्यकर्त्यांची इच्छा असते आपला नेता आमदार MLA झाला आता मंत्री Minister व्हावा, आणखी काही तरी व्हावा. या सगळ्या अपेक्षा पूर्ण होत नसतात.
Eknath shinde, Rajendra Patil Yedravkar
Eknath shinde, Rajendra Patil Yedravkarsarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोणतीही अपेक्षा ठेऊन मी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेला नव्हता. मंत्रीपदाची कोणतीही मागणी मी केलेली नव्हती तसेच कोणी शब्दही दिलेला नव्हता. पण कार्यकर्त्यांची इच्छा असते आपला नेता मंत्री व्हावा. पण संपूर्ण राज्याचा विचार करता त्यावेळी असे काही होत नसते, असे स्पष्ट मत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले.

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या यादीत सुरवातीपासून यड्रावकर यांचे नाव चर्चेत होते, पण ऐनवेळी त्यांचे नाव यादीत दिसले नाही. याविषयी आमदार यड्रावकर यांच्याकडून एका वृत्तवाहिनीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, मी निवडून येताना अपक्ष निवडून आलेलो आहे. तालुक्याच्या विकासासाठी दिलेली आश्वासने तसेच मतदारसंघाचा गेली पंधरा, वीस वर्षांचा विकासाचा बॅकलॉग होता.

Eknath shinde, Rajendra Patil Yedravkar
Sambhajiraje : 'महाविकास'नेही मंत्रिमंडळ विस्तारास महिना घेतला होता.... संभाजीराजे

आरोग्य सुविधा, एमआयडीसीच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम देणं असेल जे जे करता येईल ते मी माझ्या निवडणुकीच्या काळात आश्वासन दिले. त्यावर लोकांनी मला तीस हजार मतांनी निवडून आणले व प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. मंत्रीपदाच्या यादीत नाव नसल्याने कायकर्ते नाराज झालेत, काय भावना आहेत यावर ते म्हणाले, कार्यकर्त्यांची इच्छा असते आपला नेता आमदार झाला आता मंत्री व्हावा, आणखी काही तरी व्हावा. या सगळ्या अपेक्षा पूर्ण होत नसतात.

Eknath shinde, Rajendra Patil Yedravkar
राधाकृष्ण विखे पाटील सातव्यांदा शपथबद्ध : ६ मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याचा अनुभव गाठीशी

राज्यमंत्री पदाला ठोकर मारून तुम्ही शिंदे गटात गेला होता, त्यामुळे अपेक्षा होती. त्यावर राजेंद्र पाटील म्हणाले, कोणतीही अपेक्षा ठेऊन मी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिलेला नव्हता. सद्‌सद्‌विवेक बुध्दीला जाणून पाठिंबा दिलेला होता. मी मंत्रीपदाची मागणी केलेली नव्हती. तसा कोणी शब्दही मला दिला नव्हता.

Eknath shinde, Rajendra Patil Yedravkar
दोन राजेंना सत्तेबाहेर करण्याचा शिंदेंचे निर्धार : 'सातारा शहर महाविकास आघाडी' मैदानात

तुमचे नाव असायला हवे होते, याविषयी ते म्हणाले, कायकर्त्यांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला वाटते आपल्या नेत्‍याने मंत्री व्हावे. पण राज्याचा विचार करायचा असतो त्यावेळी अस काही होत असते. मुंबईत आला आणि लगेच निघून गेलात याविषयी विचारले असतो ते म्हणाले, एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक बोलावली होती.

Eknath shinde, Rajendra Patil Yedravkar
Shinde sarkar video : शिंदे -फडणवीस सरकारमधला श्रीमंत मंत्री कोण?

पण, मतदारंसघात अतिवृष्टी होत असून चार नद्या तालुक्यात आहेत. चार नद्यांच्या महापूराचा धोका तालुक्याला बसतो. परिस्थितीचा आढावा घेतला तसेच मी अलमट्टीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकांना महापूराचा तडाखा बसू नये याला प्राधान्य असल्याने मी मतदारसंघात परत आलो. मंत्रीपदाचा मतदारसंघाला फायदा होत असतो. पण याची भरपाई आगामी काळात चांगल्या प्रकारे विकास कामे करून आम्ही भरून काढू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com