Ekanth Shinde in Karad
Ekanth Shinde in Karad sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : यशवंतरावांनी औद्योगिक, कृषी विकास साधला...एकनाथ शिंदे

Umesh Bambare-Patil

कऱ्हाड : कृषी व औद्योगिक विकासातून ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचा पाया घालण्याचे काम केले. त्यांनी खऱ्या अर्थाने औद्योगिक व कृषी विकास साधाला. त्यामुळे आज त्यांच्या विचारावर राज्य चालत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

ज्येष्ठ नेते चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज त्यांच्या समाधीस्थळी जावून अभिवादन केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार अनिल बाबर, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, जयकुमार गोरे, महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते चव्हाण यांची ३८ वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्त अनेकांनी त्यांच्या समाधीस्थळी जावून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी प्रभाकर देशमुख, भाजपचे प्रदेश सचिव अतुल भोसले, पुरूषोत्तम जाधव, माजी सभापती देवराज पाटील, राष्ट्रवादीचे नंदकुमार बटाणे, कॉग्रेसचे भानुदास माळी यांच्यासह राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ज्येष्ठ नेते य़शवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने औद्योगिक व कृषी विकास साधाला. त्यामुळे आज राज्य त्यांच्या विचारवर चालतो आहे. त्यामुळे त्यांच्या समाधी स्थळी शासकीय अधिकारी व राज्य सरकारतर्फे अभिवादन करत आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT