Sadabhau Khot karad
Sadabhau Khot karadsarkarnama

Karad : ऊसदरासाठी सदाभाऊ खोतांचे यशवंतराव चव्हाणांच्या समाधिस्‍थळाला साकडे...

सर्व पक्षांतील कारखानदारांची Sugarcane factory युती आहे. त्यांनी शेतकऱ्यांना लुटण्याचे rob the farmers ठरवले आहे. त्यांचा स्वाहाकार हाच पक्ष आहे, अशी टीकाही सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी केली.

कोपर्डे हवेली : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळ उभी केली; परंतु आज त्यांचे चेले त्यांचा विचार विसरले आहेत. फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी त्यांचे नाव घेत आहेत. चव्हाण साहेब या कारखानदारांना उसाला ३ हजार ५०० रुपये दर देण्याची सुबुद्धी द्या, असे साकडे शेतकऱ्यांच्या वतीने कऱ्हाडातील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी आमदार सदाभाऊ खोत यांनी घातले.

कोपर्डे हवेली ते ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या पायी दिंडीच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, शेतकरी सुदाम चव्हाण, भरत चव्हाण, राजेंद्र चव्हाण, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

श्री. खोत म्हणाले, ‘‘इतर जिल्ह्यातील कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या उसाला तीन हजार १०० च्या पुढे दर दिला; परंतु जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांची २८००-२९०० रुपयावर बोळवण केली आहे. कारखान्यातील स्पर्धा वाढली, तरच उसाला चांगला भाव मिळेल. यासाठी दोन कारखान्यांतील २५ किलोमीटरचे अंतराची अट शिथिल केली पाहिजे.

Sadabhau Khot karad
राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांकडून माझ्या जिवाला धोका : सदाभाऊ खोत

सर्व पक्षांतील कारखानदारांची युती आहे. त्यांनी शेतकऱ्यांना लुटण्याचे ठरवले आहे. त्यांचा स्वाहाकार हाच पक्ष आहे. इतर व्यवसायाला कसलीही बंधने नाहीत, कोणीही कुठेही कोणताही व्यवसाय सुरू करू शकतो; परंतु साखर कारखान्यांनाच २५ किलोमीटर अंतराचे बंधन घातले आहे.’’

Sadabhau Khot karad
Sangali : तर शेतकऱ्यांच्या एकजूटीतून कारखानदारांचा काटा काढणार... राजू शेट्टी

श्री. पंजाबराव पाटील म्हणाले, ‘‘साखर कारखानदारांचा शेतकरी गुलाम झाला आहे. रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. साखरेला दर चांगला मिळतो आहे. शिवाय उसापासून इतर उपपदार्थ तयार होतात, त्यामुळे कारखानदारांना चांगला दर द्यायला परवडत आहे.’’

सचिन नलवडे म्हणाले, की ज्या यशवंतराव चव्हाण यांनी सहकार रुजवला त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे सुबत्ता आली. यशवंतराव चव्हाणांचे नाव घेऊन साखर कारखानदार राजकारण करत असतात. त्यासाठी आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी येऊन कारखानदारांना ३५०० रुपये दर देण्याची सुबुद्धी द्या, अशी मागणी केली आहे.

Sadabhau Khot karad
Sharad Pawar : यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक कायम माझ्या अंत:करणात..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com