विशाल वामनराव पाटील-
Krishna Sugar Factory News : सातारा आणि सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे शेतकी गट ऑफिस हलविण्यावरून मोठा वाद पेटला आहे. कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे असलेल्या कृष्णा कारखान्याचे मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगांव) येथील गट ऑफिस देवराष्ट्रे या ठिकाणी स्थलांतरित करण्यावरून कारखान्यांच्या गेटसमोर मोठ्या संख्येने सभासदांनी धरणे आंदोलन केले. तसेच एका संचालकांमुळे हा वाद पेटल्याचा आरोप सभासदांकडून करण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथे असलेले शेतकी गट ऑफिस देवराष्ट्रे येथे स्थलांतरित झाले आहे. सदरील ऑफिसचे स्थलांतर थांबवावे, यासह अन्य मागण्या घेऊन कारखान्याच्या गेटसमोर वडगाव व अंबक येथील सभासदांनी धरणे आंदोलन छेडले. दुपारी आंदोलन स्थळावर कार्यकारी संचालक राम पाटील यांनी भेटून सभासदांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्याशी सभासदांचा दूरध्वनीवरून संवाद करून दिला. अध्यक्ष भोसले यांनी या वेळी शेतकी गट कार्यालय मोहित्यांचे वडगाव येथेच राहणार असल्याची ग्वाही दिल्याने सभासदांनी धरणे आंदोलन मागे घेतले. ( Sugarcane Factory )
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या वेळी संचालक राम पाटील यांना निवेदन दिले असून, या निवेदनात म्हटले आहे की, कृष्णा कारखान्याचे मोहित्यांचे वडगाव येथे कारखान्याच्या स्थापनेपासून शेतकी गट ऑफिस आहे. हे कार्यालय कारखान्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव भोसले यांनी सुरू केले, परंतु हे कार्यालय सध्या देवराष्ट्रे येथे स्थलांतरित केले आहे. याबाबत कारखाना प्रशासनाकडे लेखी व तोंडी कळवले आहे. तरीही या ऑफिसमधील कर्मचारी देवराष्ट्रे येथे हजर राहतात. गेल्या दोन महिन्यांत एकाही कर्मचाऱ्याने वडगाव येथील कार्यालय उघडलेले नाही. व तेथे काही कागदपत्रे, खतावणी, रेकॉर्ड व ऊस लागण फॉर्म उपलब्ध नाहीत, परंतु कारखाना प्रशासन व शेतकी विभाग चुकीची माहिती देऊन वारंवार आमची दिशाभूल करत आहे. केवळ एका संचालकांच्या सांगण्यावरून हे होत आहे व ऑफिस बंद करून ते चालू असल्याचे खोटे सांगितले जात आहे. या खोट्या माहितीचे पत्र आम्हास मान्य नसून, याबाबत अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी स्वतः हून याबाबत आम्हास समक्ष सांगावे. ( Maharashtra Politics News )
असे नमूद करत सदरचे कार्यालय व हजेरी मशीन पूर्ववत कार्यरत करावे. मृत वारस नोंदी व्हाव्यात. ऊस नोंदी व तोडणी कार्यक्रम निःपक्षपातीपणे राबवावे. संचालकांच्या गावचे कर्मचारी शेतकी कार्यालयात नेमू नयेत. या प्रमुख मागण्यांचे निवेदन पाटील यांना देण्यात आले. या वेळी मोहित्यांचे वडगाव व अंबक येथील सुमारे शंभर सभासद उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.