Mohite Patil Sugar Factory : मोहिते पाटील कारखान्याची बारामतीच्या कंपनीने केली फसवणूक

Akluj News : बारामतीमधील संयुक्ता इंटरनॅशनल कंपनीच्या कार्यकारी संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mohite Patil Sugar Factory
Mohite Patil Sugar FactorySarkarnama

Solapur News : साखर कारखान्याच्या ॲसेटिक ॲसिड प्रकल्पास स्पिरीट पुरवतो, असे सांगून अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याची बारामती येथील एका कंपनीने सुमारे २३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बारामतीमधील संयुक्ता इंटरनॅशनल कंपनीच्या कार्यकारी संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mohite Patil's sugar factory was cheated by a company in Baramati)

अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ॲसेटिक ॲसिड प्रकल्पाचे व्यवस्थापक संपतराव देशमुख यांनी याबाबतची फिर्याद दिली होती, त्यानुसार बारामती येथील संयुक्ता इंटरनॅशनल कंपनीचे कार्यकारी संचालक संदीप काकडे देशमुख (रा. संभाजीनगर, बारामती) यांच्याविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mohite Patil Sugar Factory
Bhujbal Vs Vikhe :भुजबळांबाबत विखे पाटलांचे मोठे विधान; ‘त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी...’

अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचा ॲसेटिक ॲसिड प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाला प्रतिलिटर पन्नास रुपये दर आणि जीएसटीची रक्कम यानुसार स्पिरीटचा पुरवठा करतो, असे बारामती येथील संयुक्ता इंटरनॅशलन कंपनीकडे सांगण्यात आले होते. मोहिते पाटील कारखान्याच्या ॲसेटिक ॲसिड या प्रकल्पाला चाळीस हजार लिटर स्प्रेडचा पुरवठा करण्याचे ठरले होते.

ठरल्याप्रमाणे स्पिरीट पुरवण्याचा मोबदला सहकार महर्षी साखर कारखान्याच्या ॲसिड प्रकल्पाच्या व्यवस्थापनाकडून संयुक्ता कंपनीला २३ लाख ८१ हजार ५८० रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. तो धनादेश बारामती येथील कॅनरा बॅंकेच्या शाखेत ४ एप्रिल २०२३ रोजी वटविण्यात आला. मात्र, बारामतीच्या कंपनीकडून स्पिरीटचा पुरवठा काय होईना. तसेच, संबंधित कंपनी ही सहकार महर्षी कारखान्याकडून घेण्यात आलेली रक्कमही माघारी देईना.

Mohite Patil Sugar Factory
Shiv Sena Election Strategy : निवडणूक लोकसभेची; स्ट्रॅटेजी विधानसभेची, ठाकरेंचे सोलापूरसाठी मोठे डावपेच

शेवटी सहकार महर्षी साखर कारखान्याच्या ॲसेटिक ॲसिड प्रकल्पाचे व्यवस्थापक संपतराव देशमुख यांनी अकलूज पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याबाबतची फिर्याद दिली. त्यानुसार बारामती येथील संयुक्ता इंटरनॅशनल कंपनीचे संदीप काकडे देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Mohite Patil Sugar Factory
Kolhapur Politics : बंटी-मुश्रीफांची राज्यात कुस्ती अन्‌ कोल्हापुरात दोस्ती...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com