Radhakrishna Vikhe : मंत्री विखेंचा पृथ्वीराजबाबांवर गंभीर आरोप; म्हणाले," महाराष्ट्रात काँग्रेसची वाताहत..."

Maharashtra Politics : " आता त्यांना सरकार गेल्यानंतर सूचतंय..."
Radhakrishna Vikhe- Prithviraj Chavan
Radhakrishna Vikhe- Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

विशाल वामनराव पाटील-

Karad News : काॅंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकार 2014 मध्ये गेलं नसतं तर मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं असतं, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केल होतं. या वक्तव्याचा महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी चांगलाच समाचार घेत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच विखे यांनी महाराष्ट्रात सरकार घालवण्याचं आणि काँग्रेसची वाताहत होण्याला पृथ्वीराजबाबाच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

कोल्हापूरहून साताऱ्याकडे जाताना मंत्री विखे- पाटील यांचे कराड येथे स्वागत करण्यात आले. या वेळी प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी आदींनी स्वागत केले. या वेळी मराठा आरक्षणाबाबत मंत्री विखे- पाटील म्हणाले, आमचं सरकार मराठा समजाला आरक्षण देण्यासाठी गंभीर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe- Prithviraj Chavan
Marathwada BJP News : मोदींच्या विकासावर भाजपचाच विश्वास नाही ? मंत्री, आमदारांचीच अभियानाकडे पाठ...

याविषयी स्वतः मुख्यमंत्री यांनी 2 जानेवारीपूर्वी आम्ही आरक्षण देण्यासाठी मुदत मागितली आहे. हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, कोणाच्याही मनात कोणतीही शंका असण्याचे कारण नाही.  

सरकार पृथ्वीराजबाबांनी घालवलं

सरकार घालवण्याचे काम बाबांनी केलं. दुर्देंवाने जी महाराष्ट्रात काँग्रेसची पीछेहाट झाली, वाताहत झाली त्याला फक्त पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) बाबाच जबाबदार आहेत. आता त्यांना सरकार गेल्यानंतर त्यांना सूचतंय, सरकार असतं तर दिलं असतं यात काही तथ्य नाही.  

शरद पवार पावसात भिजले 

शरद पवार (Sharad Pawar) साताऱ्यात पावसात भिजले. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला होता. काल ठाण्यातही पावसात भिजले याबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2024 साठी हा शुभशकून असल्याचे म्हटले होते, त्यावर मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील (Radhakrishna Vikhe ) म्हणाले, प्रत्येकाची विचार करण्याची भूमिका असते. कुणाला वाटतं तो शुभशकून आहे, कुणाला वाटतं अपशकून आहे. काळ ठरवेल काय करायचं, असाही टोला विखे पाटलांनी या वेळी लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Radhakrishna Vikhe- Prithviraj Chavan
No-Confidence Motion News : अविश्वास ठरावापूर्वी भाजपच्या सरपंचांचा राजीनामा; शेणोलीत नाट्यमय घडामोडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com